WTC Final | फायनल ड्रॉ झाली तर? गावसकरांचा ICCवर हल्लाबोल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्याचा (World Test Championship Final 2021) आजचा 5 वा दिवस आहे.
साऊथम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्याचा (World Test Championship Final 2021) आजचा 5 वा दिवस आहे. या महामुकाबल्यात पाऊस आणि वातावरणाने खोडा घातला. यामुळे पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ वाया गेला. पाचव्या दिवसाच्या खेळालाही उशिरा सुरुवात झाली. वातावरणाच्या अवकृपेमुळे सामन्यातील 2 दिवस वाया गेले. त्यामुळे हा महामुकाबला ड्रॉ होण्याची चिन्हं आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार, सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात येणार आहे. आयसीसीच्या (ICC) या अयशस्वी आयोजनावरुन टीम इंडियाचे (Team India) माजी कर्णधार लिटील मास्टर सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी संताप व्यक्त केला आहे. (international cricket council should come to formula for find winner in case wtc final 2021 draw says Little Master sunil gavskar)
गावसकर काय म्हणाले?
"संयुक्त विजेतेपदाची आयडिया अयोग्य आहे. यावर आयसीसीने निर्णय घ्यायला हवा. 2019 च्या वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक चौकारांच्या निकषावर विजेता संघाची निवड करण्यात आली होती. त्यानुसार आयसीसीने इंग्लंडला विश्व विजेता घोषित केलं होतं. त्यानुसार यावेळेस ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याचा विजेता निवडण्यासाठी फॉर्म्युला हवा होता", असं गावसकर यांनी स्पष्ट केलं. ते स्पोर्ट्स तक सोबत बोलत होते. यावेळेस त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
"संयुक्त विजेता निर्णय पूर्णपणे बकवास"
"फुटबॉलमध्ये पेन्लटी शूट आऊटद्वारे विजेता संघ निवडला जातो. टेनिसमध्ये एकूण 5 सेट आणि एक टाई ब्रेकर असतो. यानुसार, या महामुकाबल्यात आयसीसीने सामना अनिर्णित राहिल्यास विजेता संघ निवडण्यासाठीचा फॉर्म्युला तयार करायला हवा", असंही गावसकरांनी नमूद केलं.
"सामन्याला पुन्हा सुरुवात करा"
पावसाच्या व्यत्ययामुळे आणि हवामानाच्या अवकृपेमुळे या महामुकाबल्यातील 2 दिवसांचा खेळ वाया गेला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्येही नाराजीचं वातावरण आहे. अशा महामुकाबल्यात येत असलेल्या अडथळ्यांमुळे खेळात सातत्याने व्यत्यय येत आहे. त्यामुळे हा सामना पुन्हा सुरु करण्यात यावा, अशी मागणी टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी केली आहे.
"सामना पुन्हा सुरु करायला हवा. हा महामुकाबला आहे, त्यामुळे हा सामना निकाली निघायला हवा. त्यासाठी सामन्याला पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी. टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकाही खेळायची आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना पावसामुळे अनिर्णित होत असल्यास, त्याला पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी", असं लाल यांनी नमूद केलं.
संबंधित बातम्या :