नवी दिल्ली : आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमिअर लीगची आतुरतेने वाट पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आयपीएल-११ च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.


या दिवशी होणार उद्घाटन सोहळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या तारखांची घोषणा केली आहे. यानुसार ६ एप्रिल रोजी ओपनिंग सेरेमनी म्हणजेच उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.


उद्घाटन सोहळा ६ एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे. यापूर्वी २७ आणि २८ जानेवारी रोजी आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 


लिलाव नियमांत काही बदल


१० सीजन पूर्ण केलेल्या आयपीएलच्या खेळाडूंच्या लिलावासंदर्भात असणाऱ्या नियमांत यंदा काही बदल करण्यात आले आहेत.


पहिली आणि शेवटची मॅच मुंबईत


आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, पहिली मॅच ७ एप्रिल रोजी मुंबईत खेळली जाणार आहे. तर, अंतिम आणि फायनल मॅच २७ मे रोजी मुंबईतच खेळली जाणार आहे.


दोन वर्षांच्या निलंबनानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यंदाच्या आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहेत.


२७ आणि २८ तारखेला खेळाडूंचा लिलाव


एक हजारांहून अधिक खेळाडूंच्या लिलावासाठी नोंदणी करण्यात आली होती. मात्र, बीसीसीआयने छाननी करुन ५७८ खेळाडूंची केली आहे. खेळाडूंना त्यांच्या प्रोफाईलच्या आधारे आठ स्लॅबमध्ये ठेवण्यात आलं आहे.


आंतरराष्ट्रीय (भारतीय आणि परदेशी)साठी स्लॅब क्रमश: दोन कोटी रुपये, १.५ कोटी रुपये, एक कोटी रुपये, ७५ लाख आणि ५० लाख रुपये ठेवण्यात आला आहे. तर, अनकॅप खेळाडूंना ४० लाख, ३० लाख आणि २० लाख रुपये ठेवण्यात आलं आहे.