IPLमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावणारा गेल अनसोल्ड, सोशल मीडियात झाला ट्रोल
आयपीएल २०१८च्या लिलावात टी-२० क्रिकेटचा बादशहा अशी ओळख असलेल्या ख्रिस गेल याला खरेदीदार न मिळाल्याने सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला.
बंगळुरु : आयपीएल २०१८च्या लिलावात खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लावली गेली. मात्र, यंदाच्या लिलावात टी-२० क्रिकेटचा बादशहा अशी ओळख असलेल्या ख्रिस गेल याला खरेदीदार न मिळाल्याने सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला आहे.
वेस्ट इंडिजचा स्टार बॅट्समन ख्रिस गेल याची बेस प्राईस दोन कोटी होती. मात्र, कुठल्याही टीमने त्याच्यासाठी बोली लावली नाही.
ख्रिस गेल यापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या टीमचा हिस्सा होता. मात्र, बंगळुरुच्या टीमनेही यंदा गेलला खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली नाही.
ख्रिस गेलने टी-२० क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सिक्सरचा अक्षरश: पाऊस पाडला होता. मात्र, तरिही गेलला कुणीही खरेदीदार मिळाला नाही त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ख्रिस गेलने १०१ आयपीएल मॅचेसच्या १०० इनिंग्समध्ये ३६२६ रन्स बनवले आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक २६५ सिक्सर त्याने लगावले आहेत आणि हा आजही एक रेकॉर्ड आहे. यामध्ये ख्रिस गेलच्या पाच सेंच्युरीचाही समावेश आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावणाऱ्यांच्या यादीत गेल अव्वलस्थानी आहे. इतकेच नाही तर सर्वाधिक रन्स बनवण्याचा रेकॉर्डही गेलच्याच नावावर आहे.
आयपीएलमध्ये गेलला खरेदीदार न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यासोबतच गेलला सोशल मीडियात ट्रोलही केलं जात आहे.
पिचवर वेगाने धावून रन्स न काढण्याच्या सवयीवर अशा प्रकारे ट्विट करण्यात आलं.
तर, या ट्विटमध्ये गेलला खरेदीदार मिळावा यासाठी प्रार्थना केली जात आहे. तसेच खरेदीदार न मिळाल्याने दु:खही व्यक्त केलं जात आहे.
सर्वांनाच कल्पना होती की यंदाच्या लिलावात गेलवर जास्त बोली लागणार नाही मात्र, त्याला खरेदीदारच न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.