नवी दिल्ली : आयपीएलच्या दोन सीझनमध्ये ७०० पेक्षा जास्त रन्स करणारा वेस्ट इंडिजचा फलंदाज क्रिस गेल याला किंग्स इलेव्हन पंजाबने दोन कोटी रूपयांना विकत घेतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी दोनदा बोली लावण्यात आलेल्य बोलीत गेलला कुणीही खेरेदी केले नव्हते.  त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण नंतर तिस-या बोलीत किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला विकत घेतले. 


पहिल्यांदाच लिलावात असे झाले


आयपीएलच्या ११व्या सीझनसाठी झालेल्या लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबने क्रिस गेल याला बेस प्राईसमध्ये विकत घेतले. खरंतर लिलावा जर एखाद्या खेळाडूवर पहिल्या दिवशी बोली लागली नाहीतर त्याच्यावर दुस-या दिवशी बोली लावली जाते. जर दुस-याही दिवशी तो खेळाडू विकला गेला नाही तर त्याला नेहमीसाठी ‘अनसोल्ड’ कॅटेगरीत टाकलं जातं. पण गेलसोबत तसे झाले नाही. गेलवर तिस-या दिवशीही बोली लावण्यात आली.


गेलने शेअर केला फोटो


याप्रकारे जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आयपीएलमधील करिअर संपण्यापासून वाचला आणि ३९ वर्षीय गेल पंजाब टीमचा भाग झाला. किंग्स इलेव्हन पंजाबच्या टीममध्ये सामिल झाल्यानंतर क्रिस गेल याने त्याच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय.



फॅन्सने केलं स्वागत


या फोटोत क्रिस गेल खूपच आनंदी दिसत आहे. गेलच्या या फोटोवर फॅन्सने नव्या टीममध्ये आल्यावर गेलचं स्वागत केलंय. या फोटोत गेल बेडवर लेटला असून त्याने पगडी परिधान केला आहे.