नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (बीसीसीआय) इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) ११ व्या सीझनच्या तारखा जाहीर केल्यात.


कधी होणार सुरुवात... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल ५१ दिवस चालणाऱ्या या टुर्नामेंटची सुरुवात ७ एप्रिल २०१८ रोजी होणार आहे. तर, आयपीएल २०१८ चा शेवटची मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच २७ मे रोजी होणार आहे.


उत्सुकता पहिल्या सामन्याची 


सीझनचा पहिला सामना रंगेल तो सद्य चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि दोनदा चॅम्पियन्स ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान... मुंबईच्या वानखेडे क्रिकेट मैदानावर ही मॅच खेळली जाणार आहे. 


उल्लेखनीय म्हणजे, एम एस धोनी कर्णधार असलेली चेन्नई टीम तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा मैदानावर परततेय... तर तीन वेळा चॅम्पियन्स ठरलेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे रोहित शर्मा...  


 




स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोन वर्षांची बंदीची शिक्षा पूर्ण करून पुन्हा परतणारी राजस्थान रॉयल्स आणि सुपर किंग्ज टीमच्या चाहत्यांसाठीही खुशखबर आहे. या दोन्ही फ्रेन्चायजी टीममध्ये क्रमश: सवाई मानसिंह स्टेडियम (जयपूर) आणि एमए चिदंबरम स्टेडियम (चेन्नई) मध्ये खेळल्या जातील. 


किंग्ज इलेव्हन पंजाब आपल्या तीन घरगुती मॅच इंदोर आणि ४ मॅच मोहालीमध्ये खेळणार आहे. 


वेळेत होणार बदल?


आगामी लीगमध्ये केवळ १२ मॅच सायंकाळी ४ वाजता खेळवल्या जाणार आहेत... तर ४८ मॅच रात्री ८ वाजता खेळवल्या जातील. या मॅच प्रेक्षक 'स्टार स्पोर्टस' या चॅनेलवर पाहू शकतील.