गौतम गंभीरचा दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा, श्रेयसकडे नेतृत्व
आयपीएलच्या ११व्या हंगामाच्या सुरुवातीलाच संघाची कामगिरी चांगली होत नसल्याने गौतम गंभीरने दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय.
मुंबई : आयपीएलच्या ११व्या हंगामाच्या सुरुवातीलाच संघाची कामगिरी चांगली होत नसल्याने गौतम गंभीरने दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. बुधवारी त्याने तडकाफडकी राजीनामा दिल्या. त्याच्या जागी आता श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करणार आहे. यंदाच्या हंगामात दिल्लीच्या संघाची कामगिरी चांगली झालेली नाही.
दिल्लीची हाराकिरी
गेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यात त्यांना मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. केवळ एकाच सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. संघाच्या या खराब कामगिरीमुळे ते आयपीएलच्या गुणतक्त्यात तळाच्या स्थानी आहेत. मुंबई आणि दिल्लीचे गुण समान आहेत. मात्र दिल्लीचा रनरेट -1.0 असल्याने दिल्लीचा संघ तळाला आहे.
संघासोबतच गौतम गंभीरची वैयक्तिक कामगिरीही यंदा तितकीशी काही खास राहिली नव्हती. कोलकाताकडून खेळताना गंभीरची चांगली कामगिरी झाली होती. आयपीेल गुणतक्त्यात पंजाब पहिल्या स्थानावर आहे. त्यांचे १० गुण आहेत. दुसऱ्या स्थानावर चेन्नई तर तिसऱ्या स्थानावर हैदराबाद आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबईचा संघही आयपीएलच्या गुणतक्त्यात शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे.