मुंबई : मुंबई : आयपीएल सीझन 11 च्या प्ले ऑफ आणि फायनल सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. हा सामना रात्री 8 वाजता सुरू होणार होता मात्र आता त्याची वेळ बदलली असून हा सामना आता 7 वाजता सुरू होणार आहे. आयपीएल सामने रात्री उशिरा संपत असल्यामुळी बीसीसीआयने प्ले ऑफ आणि फायनल सामन्याच्या वेळत बदल केला आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे. 


यासाठी केला हा मोठा बदल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजीव शुक्ला यांनी सांगितल्याप्रमाणे, आयपीएल हे पूर्णपणे फॅन्ससाठी आहे. चाहत्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आळा आहे की प्ले ऑफ आणि फायनल सामने आता एक तास अगोदर सुरू करण्यात यावेत. आयपीएलचे सामने खूप उशिरापर्यंत सुरू राहिल्यामुळे फक्त स्टेडिअममधील चाहत्यांना नाही तर टीव्ही पाहणाऱ्या दर्शकांना देखील याचा त्रास होतो. त्यामुळे हे सामने एक तास लवकर सुरू करण्यात येणार आहे. जेणे करून पुढच्या दिवशी शाळा, ऑफिस आणि कॉलेजमध्ये जायला उशिर होणार नाही. 


आयपीएलचे सामने संपल्यानंतर स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या फॅन्सना देखील घरी जायला पुरेशी वाहन व्यवस्था होत नाही. यामुळे यांना घरी जायला उशिर होतो. त्यामुळे वेळेत बदल करण्याचा निक्णय घेतला. या निर्णयावरून असं वाटतं की यापुढे सुरू होणाऱ्या आयपीएल सामन्यात बदल केला जाईल. आणि सगळेच सामने संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 


22 मे रोजी मुंबईमध्ये पहिला क्वालिफायर  आणि 27 मे ला फायनल सामना होणार आहे. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डनमध्ये 23 मे रोजी एलिमिनेटर आणि 25 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे.