आयपीएलआधीच केकेआरला झटका, सुनील नरेनची बॉलिंग पुन्हा वादात
वेस्ट इंडिज टीमचा स्टार स्पिनर सुनील नरेन पाकिस्तान सुपर लीग दरम्यान बॉलिंगमुळे पुन्हा वादात आलाय. यामुळे त्याच्या इंडियन प्रिमियर लीगमध्ये खेळण्यावर प्रश्न उपस्थित झालायं.
कराची : वेस्ट इंडिज टीमचा स्टार स्पिनर सुनील नरेन पाकिस्तान सुपर लीग दरम्यान बॉलिंगमुळे पुन्हा वादात आलाय. यामुळे त्याच्या इंडियन प्रिमियर लीगमध्ये खेळण्यावर प्रश्न उपस्थित झालायं.
नरेनविरुद्ध रिपोर्ट
नरेन हा या टी २० लीगमध्ये लाहोर कलंदर्समधून खेळतोय.बुधवारी रात्री क्वेटा ग्लेडिएटर्सविरुद्ध झालेल्या मॅचनंतर नरेनविरुद्ध मॅच अधिकाऱ्यांनी रिपोर्ट नोंदवला.
आयसीसी बॉलिंग अॅक्शन नियमानुसार जर मॅच अधिकाऱ्यांनी पुन्हा रिपोर्ट केला तर तो मालिकेतून बाहेर जाऊ शकतो.
वादग्रस्त अॅक्शन
२०१५ च्या आयपीएलमध्ये देखील नरेनच्या बॉलिंग एक्शनचा रिपोर्ट करण्यात आला. टेक्निकल कमिटीने त्याला बॉलिंग करण्यापासून थांबविले होते. आयसीसीनेदेखील वादग्रस्त अॅक्शनमुळे त्याला निलंबित केल होतं.
नियम मोडला
बॉल फेकताना त्याचा हात १५ डिग्री पेक्षा जास्त वळतो.आयसीसीच्या नियमानुसार १५ डिग्रीपर्यंत हात वळविण्याचा नियम आहे.