मुंबई : आयपीएल सुरु व्हायला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये खेळाडूंबरोबरच आता प्रेक्षकांनाही लखपती होता येणार आहे. आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकानं एका हातात कॅच पकडला, तर त्याला एक लाख रुपयाचं इनाम मिळणार आहे. आयपीएलच्या प्रत्येक मॅचवेळी प्रेक्षकाला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढच नाही तर संपूर्ण आयपीएलमधल्या सर्वात चांगला पकडणाऱ्या एका प्रेक्षकाला टाटाची नवी एसयुव्ही हॅरियर जिंकण्याचीही संधी आहे. बीसीसीआयनं आयपीएल स्पर्धेसाठी हॅरियर फॅन कॅच स्पर्धेची घोषणा केली. बीसीसीआयनं सोमवारी आयपीएलसाठी त्यांच्या अधिकृत कार पार्टनरची घोषणा केली. बीसीसीआयचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी यावेळच्या आयपीएलदरम्यान प्रेक्षकांना मिळणाऱ्या पुरस्काराची माहिती दिली.


२३ मार्चपासून यंदाच्या वर्षीच्या आयपीएलला सुरुवात होणार आहे. यंदा चेन्नई आणि बंगळुरूमध्ये पहिली मॅच खेळवण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर न झाल्यामुळे यावर्षी पहिल्या २ आठवड्यांचंच आयपीएलचं वेळापत्रक घोषित करण्यात आलं आहे.