मुंबई : राजस्थान टीमने परत एकदा आपल्या टीमचे नेतृत्व अंजिक्य रहाणेच्या खांद्यावर दिले आहे. राजस्थानचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथ वर्ल्ड कपच्या सरावासाठी मायदेशी परतल्याने ही जबाबदारी रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. राजस्थान संघ व्यवस्थापनाने  ही माहिती दिली आहे. रहाणेला त्याच्या नेतृत्वात टीमला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच म्हणजेच २० एप्रिलला त्याच्याकडून नेतृत्वपद काढून घेतले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी वर्ल्ड कपच्या सरावासाठी स्टीव्ह स्मिथ मायदेशी परतला आहे. ऑस्ट्रेलिया टीम 2 मे पासून वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून सराव शिबिराचे आयोजन केले आहे. त्यासाठी स्टिव्ह परतला आहे.


नेतृत्व काढून घेतल्यानंतर रहाणेची खेळी बहरली, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. रहाणेकडून टीमचे नेतृत्व काढून घेतल्यानंतरच्या पुढच्या म्हणजेच दिल्लीविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्याने शतक ठोकले होते. 


राजस्थानने यंदाच्या पर्वात पहिल्या ८ मॅच या  रहाणेच्या नेतृत्वात खेळल्या. रहाणेला आपल्या नेतृत्वात पहिल्या ८ पैकी केवळ २ सामने जिंकवून देता आले. रहाणेने अपेक्षित कामगिरी न केल्याने त्याच्याकडून २० एप्रिल रोजी मुंबईविरुद्ध झालेल्या मॅचआधी नेतृत्वपद काढून घेण्यात आले होते. त्याऐवजी स्टिव्ह स्मिथकडे नेतृत्व देण्यात आले होते. 


राजस्थानने आतापर्यंत एकूण १३ सामने खेळले आहेत. त्यामुळे अर्थात साखळी फेरीतील एका सामन्यासाठी टीमचे नेतृत्व रहाणेकडे दिले आहे. राजस्थान प्ले-ऑफच्या शर्यतीत आहे. पंरतु राजस्थानची प्ले-ऑफमध्ये येण्याची शक्यता ही जर-तरची आहे. 


राजस्थान आतापर्यंत खेळलेल्या १३ मॅचपैकी ५ मॅचमध्ये विजयी झाला आहे. तर ७ मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुऴे सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. राजस्थान सध्या ११ गुणांसह अंकतालिकेत ६ व्या क्रमांकावर आहे.