जयपूर : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीच्या खेळाडूंच्या लिलाव अखेर संपन्न झाला आहे. जयपूरमध्ये झालेल्या या लिलावासाठी आयपीएलच्या आठही टीम सहभागी झाल्या होत्या. आयपीएलच्या लिलावासाठी जवळपास १००३ खेळाडूंनी अर्ज केले होते. पण आयपीएलच्या सगळ्या ८ टीमनी यातल्या ३४६ खेळाडूंची यादी निवडली. लिलावामध्ये मात्र या सगळ्या खेळाडूंवर बोली लागली नाही. यातल्या काही खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला, तर अनेक खेळाडूंच्या पदरी निराशा आली. जयदेव उनाडकट आणि वरुण चक्रवर्थी या दोघांना सर्वाधिक किंमत मिळाली. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही जयदेव उनाडकट महागडा खेळाडू ठरला आहे. उनाडकटला राजस्थाननं ८.४० कोटी रुपयांना विकत घेतलंय. मागच्या वर्षीही राजस्थानच्या टीमनंचं उनाडकटला ११.५ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. या लिलावातली सगळ्यात धक्कादायक बोली वरुण चक्रवर्तीवर लागली. टीएनपीएलमध्ये खेळलेल्या वरुण चक्रवर्तीला पंजाबच्या टीमनं ८.४० कोटी रुपयांना विकत घेतलं. वरुण चक्रवर्तीची बेस प्राईज २० लाख रुपये होती. मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळख असणाऱ्या वरुण चक्रवर्ती वेगवेगळ्या प्रकारचे ७ बॉल टाकू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिलावाच्या सुरुवातीलाच भारताचा दिग्गज खेळाडू युवराजला मोठा धक्का बसला. कोणत्याच टीमनं युवराजवर बोली लावली नाही. अखेर दुसऱ्या सत्रामध्ये मुंबईनं युवराजला १ कोटी रुपयांना विकत घेतलं. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फास्ट बॉलर डेल स्टेनवरही कोणत्याच टीमनं बोली लावली नाही.


अक्सर पटेल ५ कोटी रुपयांना दिल्लीला विकला गेला, तर कार्लोस ब्रॅथवेटला कोलकात्यानं ५ कोटी रुपयांना विकत घेतलं. मुंबईच्या टीमनं या लिलावातली पहिली खरेदी केली ती लसिथ मलिंगाची. मागच्यावर्षी त्यांचा बॉलिंग प्रशिक्षक असलेल्या लसिथ मलिंगाला मुंबईनं विकत घेतलं आहे. मलिंगा हा आयपीएलमधला सगळ्यात यशस्वी बॉलर आहे. 


नेहमीप्रमाणे यंदाच्या लिलावातही वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचं वर्चस्व दिसलं. निकोलास पूरन, कार्लोस ब्रॅथवेट, शिमोरन हेटमायर हा खेळाडूंवर कोट्यवधीच्या घरात बोली लागली. पण इंग्लंडचा सॅम कुरन हा सगळ्यात महागडा परदेशी क्रिकेटपटू ठरला. सॅम कुरनला पंजाबच्या टीमनं ७.२० कोटी रुपयांना विकत घेतलं. 


विकले गेलेले खेळाडू


रियान पराग- राजस्थान- २० लाख रुपये


ऍश्टन टर्नर- राजस्थान- ५० लाख रुपये


मनन व्होरा- राजस्थान- २० लाख रुपये


श्रीकांत मुंढे- कोलकाता- २० लाख रुपये


बंडारू अय्यपा- दिल्ली- २० लाख रुपये


जो डेनली- कोलकाता- १ कोटी रुपये


शुभम रांजणे- राजस्थान- २० लाख रुपये


ऋतुराज गायकवाड- चेन्नई- २० लाख रुपये


मुरुगन अश्विन- पंजाब- २० लाख रुपये


जलाज सक्सेना- दिल्ली- २० लाख रुपये


अक्षदीप नाथ- बंगळुरू- ३.६० कोटी रुपये


युवराज सिंग- मुंबई- १ कोटी रुपये


मार्टिन गप्टील- हैदराबाद- १ कोटी रुपये


हरप्रीत ब्रार- पंजाब- २० लाख रुपये


अग्नीवेश अयाची- पंजाब- २० लाख रुपये


प्रयास बर्मन- बंगळुरू- १.५० कोटी रुपये


किमो पॉल-दिल्ली- ५० लाख रुपये


लियाम लिव्हिंगस्टोन- राजस्थान- ५० लाख रुपये


यारा पृथ्वीराज- कोलकाता- २० लाख रुपये


रसिख सलाम- मुंबई- २० लाख रुपये


प्रभसिमरन सिंग- पंजाब- ४.८० कोटी रुपये


शशांक सिंग- राजस्थान- ३० लाख रुपये


दर्शन नळकांडे- पंजाब- ३० लाख रुपये


मिलिंद कुमार- बंगळुरू- २० लाख रुपये


पंकज जैसवाल- मुंबई- २० लाख रुपये


हॅरी गर्ने- कोलकाता- ७५ लाख रुपये


अर्शदीप सिंग- पंजाब- २० लाख रुपये


निखील नाईक- कोलकाता- २० लाख रुपये


हिंमत सिंग- बंगळुरू- ६५ लाख रुपये


हार्डस विलजोएन- पंजाब- ७५ लाख रुपये


ओशेन थॉमस- राजस्थान- १.१० कोटी रुपये


एनरीच नोटजे- कोलकाता- २० लाख रुपये


शेरफेन रुदरफोर्ड- दिल्ली- २ कोटी रुपये


लॉकी फर्ग्यूसन- कोलकाता- १.६० कोटी रुपये


बरिंदर श्रन- मुंबई- ३.४० कोटी रुपये


हेनरीच क्लासीन- बंगळुरू- ५० लाख रुपये


सॅम कुरन- पंजाब- ७.२० कोटी रुपये


कॉलिन इंग्राम- दिल्ली- ६.४० कोटी रुपये


नथ्थू सिंग- दिल्ली- २० लाख रुपये


अंकुश बेन्स- दिल्ली- २० लाख रुपये


वरुण चक्रवर्ती- पंजाब- ८.४० कोटी रुपये


शिवम दुबे- बंगळुरू- ५ कोटी रुपये


सरफराज खान- पंजाब- २५ लाख रुपये


अनमोलप्रीत सिंग- मुंबई- ८० लाख रुपये


देवदत्त पडिक्कल- बंगळुरू- २० लाख रुपये


मोहित शर्मा- चेन्नई- ५ कोटी रुपये


वरुण एरॉन- राजस्थान- २.४० कोटी रुपये


मोहम्मद शमी- पंजाब-४.८० कोटी रुपये


लसिथ मलिंगा- मुंबई- २ कोटी रुपये


इशांत शर्मा- दिल्ली- १.१० कोटी रुपये


जयदेव उनाडकट- राजस्थान- ८.४० कोटी रुपये


ऋद्धीमान सहा- हैदराबाद- १.२० कोटी रुपये


निकोलास पूरन- पंजाब- ४.२० कोटी रुपये


जॉनी बेअरस्टो- हैदराबाद- २.२० कोटी रुपये


अक्सर पटेल- दिल्ली- ५ कोटी रुपये


मॉयसेस हेनरिक्स- पंजाब- १ कोटी रुपये


गुरुकीरत मान- बंगळुरू- ५० लाख रुपये


कार्लोस ब्रॅथवेट- कोलकाता- ५ कोटी रुपये


हनुमा विहारी- दिल्ली- २ कोटी रुपये


शिमरोन हेटमायर- बंगळुरू- ४.२० कोटी रुपये


या खेळाडूंची निराशा


अमन खान- विकला गेला नाही


तन्मय मिश्रा- विकला गेला नाही


केदार देवधर- विकला गेला नाही


झिशन अन्सारी- विकला गेला नाही


मयांक डागर- विकला गेला नाही


करणवीर कौशल- विकला गेला नाही


आकाश पारकर- विकला गेला नाही


जेमी ओव्हरटन- विकला गेला नाही


लॉरी इव्हान्स- विकला गेला नाही


ललित यादव- विकला गेला नाही


स्वप्नील सिंग- विकला गेला नाही


साईराज पाटील- विकला गेला नाही


सिकंदर रझा- विकला गेला नाही


फॅबियन एलन- विकला गेला नाही


संदीप वारियर- विकला गेला नाही


जसकरन सिंग- विकला गेला नाही


पॅट्रीक ब्राऊन- विकला गेला नाही


विष्णू विनोद- विकला गेला नाही


लुईस ग्रेगॉरी- विकला गेला नाही


हिमांशू राणा- विकला गेला नाही


जेम्स पॅटिनसन- विकला गेला नाही


अली खान- विकला गेला नाही


मनप्रीत गोणी- विकला गेला नाही


ड्यॅनिअल ख्रिश्चन- विकला गेला नाही


रायली रुसो- विकला गेला नाही


सत्यजीत बच्छाव- विकला गेला नाही


कियास अहमद- विकला गेला नाही


प्रवीण दुबे- विकला गेला नाही


डेल स्टेन- विकला गेला नाही


मॉर्नी मॉर्कल- विकला गेला नाही


अभिमन्यू मिथून- विकला गेला नाही


केन रिचर्डसन- विकला गेला नाही


विनय कुमार- विकला गेला नाही


ग्लेन फिलिप्स- विकला गेला नाही


कुसल परेरा- विकला गेला नाही


मुशफीकुर रहीम- विकला गेला नाही


लुक रॉन्ची- विकला गेला नाही


जेसन होल्डर- विकला गेला नाही


परवेज रसूल- विकला गेला नाही


कोरे अंडरसन- विकला गेला नाही


ऋषी धवन- विकला गेला नाही


एंजलो मॅथ्यूज- विकला गेला नाही


जिमी निशॅम- विकला गेला नाही


हाशीम आमला- विकला गेला नाही


सौरभ तिवारी- विकला गेला नाही


शॉन मार्श- विकला गेला नाही


रिझा हेन्ड्रीक्स- विकला गेला नाही


हजरतुल्लाह जजई- विकला गेला नाही


उस्मान ख्वाजा- विकला गेला नाही


रवीश्रीनिवासन साई किशोर- विकला गेला नाही


केसी करिअप्पा- विकला गेला नाही


झहीर खान- विकला गेला नाही


युवराज चुडासमा- विकला गेला नाही


जगदीशा सुचित- विकला गेला नाही


तुषार देशपांडे- विकला गेला नाही


चमा मिलींद- विकला गेला नाही


रजनीश गुरबानी- विकला गेला नाही


ईशान पोरेल- विकला गेला नाही


अनिकेत चौधरी- विकला गेला नाही


अरुण कार्तिक- विकला गेला नाही


श्रीकर भारत- विकला गेला नाही


अनुज रावत- विकला गेला नाही


बाबा इंद्रजीत- विकला गेला नाही


शेल्डन जॅक्सन- विकला गेला नाही


आयुष बदोनी- विकला गेला नाही


अरमान जाफर- विकला गेला नाही


अंकित बावने- विकला गेला नाही


सचिन बेबी- विकला गेला नाही


फवाद अहमद- विकला गेला नाही


खॅरी पेरी- विकला गेला नाही


ऍडम झंपा- विकला गेला नाही


राहुल शर्मा- विकला गेला नाही


बेन मॅकडरमेट- विकला गेला नाही


नमन ओझा- विकला गेला नाही


क्रिस जॉर्डन- विकला गेला नाही


मनोज तिवारी- विकला गेला नाही


चेतेश्वर पुजारा- विकला गेला नाही


एलेक्स हेल्स- विकला गेला नाही


ब्रॅण्डन मॅक्कलम- विकला गेला नाही


क्रिस वोक्स- विकला गेला नाही