जयपूर : २०१९ सालच्या आयपीएलसाठीचा लिलाव जयपूरमध्ये पार पडला. या लिलावामध्ये अनेक खेळाडू कोट्यधीश झाले तर विकल्या न गेलेल्या खेळाडूंच्या पदरी निराशा आली. तीन वेळा आयपीएलवर नाव कोरलेल्या मुंबईनंही या लिलावात सहभाग घेतला होता. पण मुंबईनं लिलावामध्ये संयम दाखवणंच पसंत केलं. बरिंदर श्रन हा लिलावातला मुंबईचा सगळ्यात महागडा खेळाडू होता. बरिंदरला मुंबईनं ३.४० कोटी रुपयांना विकत घेतलं. बरिंदरबरोबरच मुंबईनं युवराज सिंग आणि लसिथ मलिंगालाही टीममध्ये स्थान दिलं आहे. याशिवाय मुंबईनं रसिख सलाम, पंकज जैसवाल, अनमोलप्रीत सिंग या नवोदितांनाही टीममध्ये जागा दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईनं लिलावात विकत घेतलेले खेळाडू


युवराज सिंग- मुंबई- १ कोटी रुपये


रसिख सलाम- मुंबई- २० लाख रुपये


पंकज जैसवाल- मुंबई- २० लाख रुपये


बरिंदर श्रन- मुंबई- ३.४० कोटी रुपये


अनमोलप्रीत सिंग- मुंबई- ८० लाख रुपये


लसिथ मलिंगा- मुंबई- २ कोटी रुपये


आयपीएलच्या मागच्या मोसमात मुंबईची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. २०१८ साली मुंबईचं आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात आलं होतं. मुंबईनं २०१३, २०१५ आणि २०१७ ही तीन वर्ष आयपीएल जिंकली होती. आता २०१९ साली पुन्हा एकदा आयपीएलवर नाव कोरण्यासाठी मुंबईची टीम मैदानात उतरेल.


आता अशी असेल मुंबईची टीम


रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड, बेन कटिंग, मिचेल मॅकलेनघन, ऍडम मिलन, जेसन बेहरेनड्रॉफ, युवराज सिंग, रसिख सलाम, पंकज जैसवाल, बरिंदर श्रन अनमोलप्रीत सिंग, लसिथ मलिंगा