मुंबई : प्लेऑफसाठी तीन टीमने आपली जागा निश्चित केली आहे. आता फक्त एका जागेसाठी रंगत पाहायला मिळणार आहे. प्ले-ऑफचे सामने अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. अशातच दिल्लीसाठी एक वाईट बातमी आहे. दिल्लीचा वेगवान आणि या पर्वात यशस्वी ठरलेल्या खगीसो रबाडा पुढील सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे दिल्लीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रबाडा पाठदुखीमुळे चेन्नई विरुद्ध सामना खेळू शकला नव्हता. रबाडा लवकरच दक्षिण आफ्रिकेला परतणार आहे. आफ्रिका टीम मॅनेजमेंटने त्याला वर्ल्ड कप आधी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.


रबाडाची कामगिरी


रबाडाने यंदाच्या पर्वात चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली टीम प्ले-ऑफमध्ये पोहचण्यात त्याचे  देखील योगदान आहे. रबाडाने यंदाच्या पर्वात एकूण 12 मॅच खेळला आहे. यात त्याने 25 विकेट घेतले आहे. तो या पर्वातील पर्पल कॅप विनर आहे. आयपीएलच्या कोणत्याही एका पर्वात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरला ही कॅप दिली जाते. हा मान प्रत्येक मॅचनुसार विकेटच्या बदलत्या आकड्यानुसार दिला जातो.


दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कपसाठीच्या 15 खेळाडूंच्या टीमची घोषणा केली आहे. यात रबाडाचा देखील समावेश आहे. 'आयपीएलचं हे पर्व शेवटच्या टपप्यात आहे. अशा परिस्थितीत आपल्या टीमला सोडून जाणे माझ्यासाठी दुखदायी आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला देखील काही दिवसचं उरलेत. आयपीएलचे हे पर्व माझ्य़ासाठी मैदानाबाहेर आणि आत देखील फार चांगले राहिले. आयपीएलचे हे पर्व दिल्लीच जिंकेल.' असा विशवास त्याने व्यक्त केला आहे.


 



दक्षिण आफ्रिका विरुद्ध यजमान इंग्लंड यांच्यात 30 मे रोजी पहिली मॅच खेळली जाणार आहे. याआधी हैदराबादकडून खेळणारा डेव्हिड वॉर्नर आणि राजस्थानचा स्टीव्ह स्मिथ वर्ल्ड कपसाठीच्या सरावासाठी आयपीएल सोडून मायदेशी परतले आहेत.


दिल्लीने तब्बल 7 वर्षानंतर प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. दिल्ली साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना शनिवारी राजस्थान विरुद्ध खेळणार आहे. दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या 13 मॅचपैकी 8 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर 5 मॅचमध्ये पराभव झाला आहे. दिल्ली 16 पॉईंटसह अंकतालिकेत 3 ऱ्या क्रमांकावर आहे.