कोलकाता : आयपीएलचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. बाद फेरीत (प्ले-ऑफ) पात्र ठरण्यासाठी अटी तटीची लढत पाहायला मिळत आहे. राजस्थान विरुद्ध कोलकाता यांच्यात २५ एप्रिलला सामना खेळण्यात आला. या लढतीत कोलकाताने राजस्थानने ३ विकेटने मात केली. राजस्थानने मिळवलेल्या या विजयामुळे अंकतालिकेतील सर्व समीकरण बदलले आहेत. आता जर प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर कोलकाता, बंगळुरु आणि राजस्थान या टीमना आपल्या उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. या तीन्ही टीमचे प्रत्येकी ८ पॉईंट आहेत. त्यामुळे या तीन्ही संघाना प्ले-ऑफ मध्ये पोहचण्याची किंचीत संधी आहे. यासाठी या संघाना आपले उर्वरित सामने जिंकावे लागतील. तसेच प्रतिस्पर्धी टीमचा पराभव झाल्यास प्लेऑफचा वाट सोपी होणार. एकूणच सर्व परिस्थिती ही जर-तरची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या-१२ व्या पर्वात नेहमीप्रमाणे चेन्नईने प्लेऑफसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे चेन्नई यंदाच्या पर्वात प्ले-ऑफसाठी पात्र ठरणारी पहिलीच टीम आहे. चेन्नईने खेळलेल्या एकूण ११ मॅचपैकी ८ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे अकंतालिकेत चेन्नई १६ पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. चेन्नई प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवल्याने आता केवळ तीन टीमना प्ले-ऑफसाठीच संधी आहे. अंकतालिकेत दिल्ली ७ विजयासह १४ पॉईंट मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबई देखील १२ पॉईंटसह प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम आहे.


याखालोखाल हैदराबाद आणि पंजाब या दोन्ही टीमने प्रत्येकी ५ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे या दोन्ही टीमचे १० पॉईंटसह चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या दोन्ही टीमची परिस्थिती ही फारशी वाईट नाही, पण उत्तम देखील नाही. आयपीएलच्या-१२ व्या पर्वात हैदराबाद आतापर्यंत १० मॅच खेळली आहे. तर पंजाब ११ मॅच खेळली आहे. या दोन्ही टीमला प्लेऑफसाठी संधी आहे. परंतु यासाठी उर्वरित मॅच जिंकाव्या लागतील, तेही चांगल्या नेट रनरेटने. 


आयपीएलच्या प्ले-ऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी १६ पॉईंट म्हणजेच ८ मॅचमध्ये विजय मिळवावा लागतो. यापेक्षा कमी म्हणजेच १४ पॉईंट असल्यावर नेट रन रेटच्या निकषानुसार प्ले-ऑफ मध्ये स्थान मिळते. या पर्वात किमान ४-५ टीम या १४ पॉइंटचा टप्पा गाठतील.


याचाच अर्थ की, किमान १४ पॉईंट असणारी टीम प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम असेल. कोलकाता, बंगळुरु आणि राजस्थान या टीमने खेळलेल्या ११ मॅचपैकी ४ मॅचमध्ये विजय मिळवला आहे. म्हणजेच ८ पॉईंट आहेत. उर्वरित ३ पैकी सर्व मॅच जिंकणारी टीम ही प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकून राहतील.  पंरतु निर्णायक वेळी नेट रनरेटच्या सहाय्यानेच प्ले-ऑफमध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळे फक्त विजय मिळवून नाही, तर मोठ्या अंतराने विजय गरजेचं असणार आहे. तर दुसऱ्या ठिकाणी जर या टीमपैकी कोणतीही टीम एक जरी सामन्यात पराभूत होते तर ती सरळ प्ले-ऑफच्या स्पर्धेतून बाहेर फेकली जाईल. त्यामुळे या तीन्ही टीमसाठी पुढील ३ मॅच करो किंवा मरो च्या असणार आहे. 


कोलकाता टीम या पर्वातील ३ मॅच खेळणे बाकी आहेत. यापैकी २ मॅच या मुंबई विरुद्ध होणार आहे. तर एक मॅच पंजाब विरुद्ध असणार आहे. राजस्थान दिल्ली, बंगळुरु आणि हैदराबाद यांच्या विरुद्ध उर्वरित सामने खेळणार आहे. तर बंगळुरु राजस्थान, दिल्ली आणि हैदराबाद विरुद्ध लढणार आहे.