मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव मंगळवारी जयपूरमध्ये पार पडला. या लिलावामध्ये काही खेळाडूंच्या पदरी निराशा आली तर काही नवोदित खेळाडू एका रात्रीत कोट्यधीश झाले. पण या लिलावामध्ये कपिल देव असते तर त्यांच्यावर २५ कोटी रुपयांची बोली लागली असती, असं वक्तव्य भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी केलं आहे. कपिल देव हे भारतानं दिलेले जगातले सगळ्यात महान ऑलराऊंडर आहेत. कपिल देव हे बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्हीच्या माध्यमातून मॅच जिंकवून देऊ शकत होते, अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या कपिल देव खेळत असते तर त्यांना आयपीएलच्या लिलावामध्ये किती रक्कम मिळाली असती? असा प्रश्न गावसकर यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना गावसकर यांनी कपिल देवना २५ कोटी रुपये सहज मिळाले असते, असं सांगितलं.


१९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये त्यांनी केलेली खेळी ही मी आयुष्यात बघितलेली सर्वोत्तम असल्याचा दाखला गावसकर यांनी दिला. मी खेळाडू असताना किंवा कॉमेंट्री करत असतानाही अशी खेळी आजपर्यंत बघितली नसल्याचं गावसकर म्हणाले.


त्या मॅचमध्ये भारताची अवस्था १७/५ अशी होती. इंग्लंडमधलं वातावरणही थंड होतं आणि त्यामुळे बॉल स्विंग होत होता. आम्ही ६० किंवा ७० रनवर ऑल आऊट होऊ, असंच वाटत होतं, असं वक्तव्य गावसकर यांनी केलं. झिम्बाब्वेविरुद्धच्या त्या मॅचमध्ये कपिल देव यांनी १३८ बॉलमध्ये १७५ रनची खेळी केली होती. कपिल देव यांनी त्यांच्या खेळीत ६ सिक्स आणि १६ फोर मारले होते. त्या मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला होता. 


आयपीएलमध्ये लिलाव झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी