आयपीएलच्या या टीममधल्या सर्वाधिक खेळाडूंची वर्ल्ड कपसाठी निवड
राजस्थान टीमच्या कोणत्याही खेळाडूला भारताकडून वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली नाही.
मुंबई : २०१९ सालच्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत निवड समितीच्या पत्रकार परिषदेत वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. एका बाजूला आयपीएलची धूम सुरु असताना वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई आणि चेन्नई या आयपीएल टीममधले सर्वाधिक ३ खेळाडू हे भारताकडून वर्ल्ड कप खेळणार आहेत. तर कोलकाता, पंजाब, बंगळुरु आणि हैदराबाद या टीमकडून प्रत्येकी २ खेळाडूंना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. दिल्लीकडून केवळ एकाच खेळाडूची वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड झाली आहे. तर राजस्थान टीमच्या कोणत्याही खेळाडूला भारताकडून वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली नाही.
आयपीएल टीम आणि वर्ल्ड कपमधील खेळाडू
मुंबई
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या.
चेन्नई
केदार जाधव, एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा.
कोलकाता
दिनेश कार्तिक आणि कुलदीप यादव.
पंजाब
मोहम्मद शमी आणि केएल राहुल.
हैदराबाद
भुवनेश्वर कुमार आणि विजय शंकर.
बंगळुरू
विराट कोहली आणि युझवेंद्र चहल
दिल्ली
शिखर धवन
आयपीएलमधील एकूण आठ टीम सहभागी आहेत. त्यापैकी सात टीममधील खेळांडूची निवड वर्ल्ड कपसाठी झाली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला ३० मे पासून इंग्लंड मध्ये सुरुवात होत आहे. तर भारताची पहिली मॅच ५ जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे.