मुंबई : आयपीएल २०१९ च्या फायनलला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे. मुंबई आणि चेन्नई या टीममध्ये आयपीएलची फायनल रंगेल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना होईल. संध्याकाळी ७.३० वाजता मॅचला सुरुवात होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी पहिल्या प्ले-ऑफमध्ये मुंबईने चेन्नईला अगदी सहज पराभूत केलं होतं. या मॅचमध्ये मुंबई फक्त ३ परदेशी खेळाडू घेऊनच मैदानात उतरवलं होतं. आयपीएलच्या नियमांनुसार एका मॅचमध्ये टीम जास्तीत जास्त ४ परदेशी खेळाडूंना घेऊन खेळू शकते. त्यामुळे फायनलमध्ये मुंबई जयंत यादवच्या ऐवजी फास्ट बॉलर मिचेल मॅकलेनघन किंवा ऑलराऊंडर बेन कटिंगचा टीममध्ये समावेश करू शकते.


या एका बदलाशिवाय रोहित शर्मा या मॅचमध्ये युवराज सिंगचा हुकमी एक्का म्हणून वापर करू शकतो. पण युवराज सिंगला टीममध्ये घ्यायचं असेल, तर त्याला इशान किशनची जागा द्यावी लागेल.


या मोसमात युवराज सिंगने ४ मॅचच्या ४ इनिंगमध्ये २४.५० ची सरासरी आणि १३०.६६ च्या स्ट्राईक रेटने ९८ रन केले आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. तर इशान किशनने ६ मॅचच्या ५ इनिंगमध्ये १५.६० च्या सरासरीने आणि १०५.४० च्या स्ट्राईक रेटने ७८ रन केले आहेत.


इशान किशनची कामगिरी युवराजपेक्षा चांगली दिसत नसली, तरी चेन्नईविरुद्ध झालेल्या पहिल्या प्ले ऑफमध्ये इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्यामध्ये ८० रनची महत्त्वपूर्ण पार्टनरशीप झाली. यामुळे मुंबईचा विजय सोपा झाला. ३१ बॉलमध्ये २८ रन करून इशान किशन आऊट झाला.


मागच्या मॅचमध्ये इशान किशनने चांगली कामगिरी केली असली तरी आयपीएल फायनलच्या दबावाच्या मॅचमध्ये युवराज सिंगचा अनुभव कामाला येऊ शकेल. त्यामुळे रोहित शर्मा इशान किशनच्या जागी युवराजचा विचार करू शकतो.