IPL 2019 : मुंबई विरुद्ध कोलकाता, मुंबईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
मुंबईने आधीच प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे.
मुंबई : मुंबई-कोलकाता यांच्यात आज ८ वाजता सामना खेळला जाणार आहे. मुंबईने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना मुंबईच्या होम ग्राऊंड म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. मुंबईने आधीच प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. कोलकाताला प्ले-ऑफच्या स्पर्धेत कायम राहण्यासाठी ही मॅच जिंकणे अनिर्वाय असणार आहे.
या मॅचमध्ये मुंबईने टीममध्ये २ बदल केले आहेत. एव्हिन लुईसच्या जागी इशान किशनला आणि बरिंदर सरनच्या जागी मिचेल मॅकलेनघनला संधी देण्यात आली आहे. तर कोलकात्याने पियुष चावलाच्याऐवजी प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली आहे.
तर दुसऱ्या ठिकाणी मुंबईने प्ले-ऑफमध्ये धडक मारली असली तरी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल. कारण मुंबई अंकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर हा सामना मुंबईने जिंकला तर नेट रनरेट च्या आधारावर अंकतालिकेत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर पोहचेल.
प्लेऑफच्या टप्प्यात पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या टीमला फायनलमध्ये पोहचण्यासाठी दोनवेळा संधी मिळते. त्यामुळे मुंबई कोलकाताचा पराभव करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. मुंबई कोलकाता हे संघ आतापर्यंत २४ वेळा आमने सामने भिडले आहेत. यापैकी १८ वेळा मुंबईने विजय मिळवला आहे. त्यामुळे कोलकाताविरुद्ध खेळतानाचा मुंबईचा रेकॉर्ड दमदार आहे.
कोलकाताने याआधी २८ एप्रिलला झालेल्या मॅचमध्ये मुंबईचा ३४ रननी पराभव केला होता. आंद्रे रसेलने या सामन्यात ८० रनची निर्णायक खेळी केली होती. तर शुभमन गिलने देखील मुंबईच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यामुळे या दोघांना लवकर आऊट करण्याचे आव्हान मुंबईच्या बॉलर्ससमोर असणार आहे.
मुंबई : रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, इशान किशन, सूर्यकूमार यादव, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल चहर, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह आणि मिचेल मॅकलेनघन
कोलकाता : दिनेश कार्तिक (कॅप्टन), क्रिस लिन, सुनील नारायण, रिंकू सिंह, रॉबिन उथप्पा, शुभमन गिल, नीतीश राणा, आंद्रे रसेल, प्रसिद्ध कृष्णा, हैरी गुर्ने आणि संदीप वॉरियर