चेन्नई : आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफ सामन्यामध्ये मुंबईच्या बॉलरनी शानदार कामगिरी करत चेन्नईला १३१ रनवर रोखलं आहे. या मॅचमध्ये धोनीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. पण मुंबईच्या बॉलरनी सुरुवातीपासूनच चेन्नईला धक्के दिले. चेन्नईची अवस्था ३२-३ आणि ६५-४ अशी झाली होती. पण यानंतर धोनी आणि रायुडूने चेन्नईचा डाव सावरला. अंबाती रायुडने ३७ बॉलमध्ये सर्वाधिक नाबाद ४२ रन केले, तर धोनीने २९ बॉलमध्ये नाबाद ३७ रनची खेळी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकडून राहुल चहरने सर्वोत्तम कामगिरी केली. चहरने ४ ओव्हरमध्ये १४ रन देऊन २ विकेट घेतल्या. तर कृणाल पांड्या आणि जयंत यादवला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा


पराभूत टीमला आणखी एक संधी


मुंबई आणि चेन्नईपैकी जी टीम विजयी होईल ती थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर पराभव झालेल्या टीमला आणखी एक संधी मिळेल. ८ मे रोजी दिल्ली आणि हैदराबादमध्ये एलिमिनेटर मॅच होईल. विशाखापट्टणममध्ये संध्याकाळी ७.३० वाजता या मॅचला सुरुवात होईल. या मॅचमध्ये ज्या टीमचा पराभव होईल ती टीम बाहेर जाईल. तर शुक्रवार १० मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना होईल. मुंबई आणि चेन्नईच्या मॅचमध्ये ज्या टीमचा पराभव होईल त्या टीमचा सामना दिल्ली-हैदराबाद मॅचमधल्या विजयी टीमशी होईल. क्वालिफायर-२ मध्ये विजय मिळवलेली टीम रविवारी १२ मे रोजी आयपीएलची फायनल खेळेल.