मुंबई : आयपीएलच्या प्लेऑफच्या सामन्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्लेऑफ आणि फायनल संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. सध्या आयपीएलच्या मॅच रात्री ८ वाजता सुरु होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लेऑफमध्ये क्वालिफायर-१ ७ मे रोजी चेन्नईमध्ये, एलिमिनेटर ८ मे रोजी आणि क्वालिफायर-२ विशाखापट्टणममध्येखेळवली जाईल. तर फायनल १२ मे रोजी हैदराबादमध्ये होईल.


महिला टी-२० स्पर्धेचे सामनेही ७.३० वाजता सुरु होतील. एलिमिनेटर आणि महिलांची दुसरी मॅच एकत्र होत असल्यामुळे महिलांची मॅच दुपारी ३.३० वाजता सुरु होणार आहे. या सगळ्या मॅच जयपूरमध्ये होणार आहेत.


सुपरनोवाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हिलॉसिटी या तीन टीम एकमेकांविरुद्ध प्रत्येकी १-१ मॅच खेळतील. ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोवाज यांच्यामध्ये ६ मे रोजी, ट्रेलब्लेझर्स आणि व्हिलॉसिटी यांच्यात ८ मे रोजी सामने होतील. सुपरनोवाज आणि व्हिलॉसिटी यांच्यात ९ मे रोजी सामना रंगेल. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या टीममध्ये ११ मे रोजी फायनल खेळवण्यात येईल.