आयपीएल २०१९च्या वेळापत्रकाची आज घोषणा ?
बीसीसीआय आयपीएलचं वेळापत्रक घोषित करू शकते, असं वृत्त मुंबई मिररनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
मुंबई : २०१९ सालच्या आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा आज होऊ शकते. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आयपीएलचं वेळापत्रक जाहीर करण्याचा बीसीसीआयचा मानस होता. पण आता निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची वाट न बघता, बीसीसीआय आयपीएलचं वेळापत्रक घोषित करू शकते, असं वृत्त मुंबई मिररनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. बीसीसीआयनं आयपीएलचं वेळापत्रक जाहीर केलं असलं तरी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या वेळापत्रकात बदल केले जाऊ शकतात.
संघ मालकांचा विरोध
दरवर्षीच्या आयपीएलमध्ये प्रत्येक टीम १४ सामने खेळते. यातले ७ सामने प्रत्येक टीम स्वत:च्या घरच्या मैदानात आणि उरलेले ७ सामने प्रतीस्पर्धी टीमच्या घरच्या मैदानात खेळते. यावेळी मात्र प्रत्येक टीम ३ सामने त्यांच्या घरच्या मैदानात खेळेल, अशी शक्यता आहे.
यासोबतच या स्पर्धेच आयोजन भारतात व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण येत्या काळात भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने सुरक्षेच्या कारणांमुळे या स्पर्धेचं आयोजन परदेशात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परदेशात युएई आणि दक्षिण आफ्रिका यापैकी एका देशात आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते.
याआधी भारतात २००९ ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएल सामन्यांचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत केले होते. तर २०१४ साली देखील निवडणुकांमुळे काही सामन्यांचे आयोजन युएई येथे करण्यात आले होते. पण यंदाची आयपीएल स्पर्धा भारतातचं होईल, असं बीसीसीआयनं सांगितलं होतं. २३ मार्चपासून आयपीएलची सुरुवात होईल, अशी घोषणा बीसीसीआयनं केली होती.