मुंबई : बंगळुरू विरुद्ध मुंबई या संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आपली बाजू जड आहे असं वाटत असणाऱ्या विराट सेनेचा मुंबईच्या संघानं धुव्वा उडवून दिला. बंगळुरूच्या संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात असतानाच विराटसह काही खेळाडूंनी क्रीडारसिकांची निराश केली. सामन्यात प्रथम फलंदाजी केल्यानंतर या संघाचं आव्हान पेलत मुंबईनं हा सामना खिशात टाकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच गडी राखत मुंबईनं बंगळुरू संघाला पराभूत केलं आणि यंदाच्या वर्षीच्या IPL 2020 मधील या हंगामात प्ले ऑफमधील स्थान भक्कम केलं. देवदत्त पडिक्कलच्या शतकी खेळीच्या बळावर बंगळुरूच्या संघानं प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर 164 धावांचा डोंगर रचला. याच आव्हानाला सामोरं जाण्यासाठी मुंबईचा संघ मैदावनावर आला.



क्विंटन डिकॉक अवघ्या 18 धावांवर बाद झाला. त्यामागोमाग इशान किशनही फार काळ खेळपट्टीवर टीकू शकला नाही. कृणाल आणि हार्दिक पांड्यालाही प्रभावी खेळ करता आल नाही. एकिकडे संघाची ही अवस्था असतानाच दुसरीकडे सूर्यकुमार यादवनं मात्र खऱ्या अर्थानं संघाला विजयी टप्प्यावर आणलं. 43 चेंडूंमध्ये त्यानं 10 चौकार आणि 3 षटकारांची बरसात करत नाबाद 79 धावा केल्या. संघाला विजय मिळवून दिल्यानंतर त्यानं मोठ्या आत्मविश्वासानं दिलेली प्रतिक्रिया सामन्याला उपस्थित खेळाडूंपासून ते टीव्हीवर हा सामना पाहणाऱ्या प्रत्येकाचीच मनं जिंकून गेली.