दुबई : आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिल्लीने 56 रनने पराभव केला. या पराभवामुळे आरसीबीच्या गुण तालिकेत मोठा फरत पडणार आहे. दिल्लीने बंगळुरुला 177 धावाचं टार्गेट दिलं होतं. पण बंगळुरुचा संघ फक्त 137 रनच करु शकला. ज्यामुळे आरसीबी टीमला मोठा पराभव पत्करावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. टॉसनंतर चुकीचा निर्णय


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. कारण दिल्ली कॅपिटलचा सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी पॉवरप्लेमध्ये बंगळुरूच्या गोलंदाजांवर आक्रमण करत विकेट न गमवता 63 रन ठोकले.


2. मार्कस स्टोईनिसलाजीवनदान


या सामन्यात दिल्लीचा फलंदाज मार्कस स्टोइनिसने 26 बॉलमध्ये नाबाद 53 धावांची खेळी केली. पण त्याआधी बंगळुरूच्या युजवेंद्र चहलने तो 30 रनवर असताना त्याचा कॅच सोडला.


3. डेथ ओव्हर्समध्ये रन


शेवटच्या षटकात बंगळुरूची गोलंदाजी अजूनही संघाच्या चिंतेचे कारण ठरली आहे. दिल्लीविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजीचा सामना करत अखेरच्या 6 ओव्हरमध्ये 79 रन दिले.


4. फलंदाजी खराब सुरू झाली


197 रन्सचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात खूपच खराब झाली. फॉर्ममध्ये असलेला देवदत्त पेडिकलच्या रुपात आरसीबीला पहिला झटका लागला. पॉवरप्लेपर्यंत 43 च्या स्कोअरवर आरोन फिंच आणि एबी डिव्हिलियर्सची विकेट गेली होती.


5. खराब फलंदाजी बनले पराभवाचे कारण


दिल्ली कॅपिटल विरुद्धच्या सामन्यात आरसीबी टीमचे फलंदाज आपल्या फलंदाजीने काही खास कामगिरी करु शकले नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली 43 रनवर आऊट झाला. तो सोडून कोणताही खेळाडू चांगला खेळ करु शकला नाही.