दुबई : आयपीएल (IPL 2020) च्या 53व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने किंग्स इलेवन पंजाबचा 9 विकेटने पराभव केला आहे. चेन्नईने टॉस जिंकत आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. किंग्स इलेवन पंजाबने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमवत 153 रन केले आहेत. पंजाबकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक नाबाद 62 रन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई सुपर किंग्जच्या टीमने 18.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमवत विजय मिळवला. ऋतुराज गायकवाडने आज देखील चांगली कामगिरी केली.


किंग्स इलेवन पंजाबच्या पराभवानंतर आता प्ले ऑफसाठी त्यांचा रस्ता आणखी कठीण झाला आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचा हा शेवटचा सामना होता. प्ले ऑफमध्ये जागा बनवण्यात ते अपयशी ठरले आहेत. 


आधी बॅटींगसाठी मैदानात आलेल्या किंग्स इलेवन पंजाबने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमवत 153 रन केले. चेन्नई सुपर किंग्सने 18.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमवत लक्ष्य़ गाठलं.


चेन्नईचा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली. त्याने त्यांचं तिसरं अर्धशतक पूर्ण केलं. 38 बॉलमध्ये त्याने आज अर्धशतक ठोकलं.