IPL 2020 : CSK vs RCB ड्रीम 11 टीम
चेन्नई संघात काही बदल होणार का?
दुबई : आयपीएल 2020 च्या 25 व्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली आमने-सामने असतील. कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आतापर्यंत 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज तिसर्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. चेन्नईने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
शनिवारी होत असलेल्या या सामन्यात जो संघ पराभूत होईल त्याची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा धोक्यात येऊ शकते हे कोहली आणि धोनीला ठाऊक आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 24 सामने झाले असून धोनीचा संघ 15 सामने जिंकू शकला आहे तर कोहलीने 8 सामने जिंकले आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हा सामना 7 वाजता टॉस झाल्यानंतर 7.30 वाजता सुरु होणार आहे.
स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
CSK vs RCB ड्रीम 11 टीम
विकेटकीपर : महेंद्रसिंह धोनी
बॅटसमन : विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, एबी डिव्हिलियर्स, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस
ऑलराऊंडर : सॅम करन, शिवम दुबे
बॉलर : युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपरकिंग्ज
शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायडू, एमएस धोनी (विकेटकीपर / कर्णधार), केदार जाधव, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कर्ण शर्मा.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
देवदत्त पडिक्कल, आरोन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स (विकेटकीपर), मोईन अली, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, इसरू उडाना, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.