दुबई : आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 47 व्या सामन्यात मंगळवारी दिल्ली कॅपिटल आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. हा महत्त्वपूर्ण सामना जिंकून दिल्ली प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. मागील दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर शेवटच्या सामन्यात कोलकाताकडून त्यांचा पराभव झाला आहे. या सामन्यात सुनील नरेन आणि नितीश राणा यांनी दिल्लीचे फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलच्या बॉलवर चांगले रन काढले.


संघाची गोलंदाजी सर्व हंगामात चांगली राहिली. अश्विन आणि पटेल दोघांनीही मधल्या षटकांत महत्त्वपूर्ण वेळी विकेट्स घेत संघाच्या शानदार प्रकारात योगदान दिले.


वेगवान गोलंदाजी विभागात हैदराबादच्या फलंदाजांना कागिसो रबाडा आणि एनरिक नॉर्ट्जेचा सामना करणं कठीण होईल. या दोघांशिवाय तुषार देशपांडेनेही आपल्या गोलंदाजीने चांगली कामगिरी केली आहे.
 
पृथ्वी शॉ मागच्या सामन्यात खेळला नव्हता. त्याच्या जागी अजिंक्य रहाणेने ओपनिंग केली होती. पण तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. धवन, कर्णधार श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि मार्कस स्टोइनिस यांची बॅट मागच्या सामन्यात चालली नाही. पण ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.