IPL इतिहास : क्रिकेटच्या महासंग्रामाला जबर हादरा देणाऱ्या `या` महिला माहितीयेत?
त्यांच्याभोवती असणाऱ्या वादाच्या वर्तुळानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या
मुंबई : क्रिकेटचा महासंग्राम म्हणजे आयपीएल अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलं आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेच्या नव्या पर्वाचं आयोजन बरंच लांबणीवर पडलं. पण, तरीही स्पर्धा पार पडत असल्याचा आनंद अनेकांना आहे. आयपीएलच्या झगमगाटाच्या आड एक वादाची झालरही आहे. ही झालरही तितकीच लक्षवेधी. मैदानाच्या खेळपट्टीवर पुरुष खेळाडू क्रीडारसिकांच्या मनाचा ठाव घेत असले तरीही आयपीएलमध्ये महिलांचीही लक्षवेधी भूमिका दिसून येते. मग, ती संघाच्या मालकी संदर्भात असो किंवा एखाद्या वादाच्या कारणासाठी असो. आयपीएच्या आतापर्यंतच्या इतिहासात अशाही काही महिलांची चर्चा झाली ज्यांनी अनेकांना हादराच दिला.
चिअरलीडर गॅब्रिएलानं केलेले गौप्यस्फोट
गॅब्रिएला पास्क्यूलोचोला बहुधा अनेकजम ओळखतही नसतील. पण, आयपीएलच्या २०११ मधील हंगामामध्ये क्रिकेटप्रेमींमध्ये तिचीसुद्धा चर्चा होती. त्या हंगामामध्ये गॅब्रिएला मुंबईच्या संघाची चिअरलीडर होती. पण, त्यादरम्यानच तिन आपल्या वाईट अनुभवांविषयी ब्लॉग लिहित सर्वांनाच धक्का दिला होता. आयपीएलमधील पार्टीबाबत तिनं खळबळजनक माहिती उघड केली होती.
मल्ल्याची मुलगी लैला हिच्याकडून आयकर कागदपत्र लंपास
आयपीएलमध्ये खऱ्या वादंगाची सुरुवात झाली ती म्हणजे २०१० मध्ये. ज्यावेळी धनाढ्य व्यक्तींना त्यांचा काळा पैसा आयपीएलमध्ये गुंतवण्याचा मार्ग सापडल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली. पुढं कारवाईअंतर्गत धाडीही टाकण्यात आल्या. पण, तत्कालीन आयपीएल अध्यक्ष ललित मोदी यांच्या कार्यालयातून काही कागदपत्र लंपास केले गेल्याची माहिती समोर आहे. हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला ही कागदपत्र आणि लॅपटॉप नेताना दिसली.
पुढे, तपासातून मिळालेल्या माहितीनुसार लैला महमूद असं या महिलेचं नाव असल्याचं कळलं. मद्यसम्राट विजय मल्ल्या याची ती सावत्र मुलगी असल्याचं म्हटलं गेलं.
न्यूड फोटो पाठवणाऱ्या सोफियाची रेव्ह पार्टी
हिंदी चित्रपटांमध्ये छोटेखानी भूमिका साकारणारी ही तीच सोफिया हयात जिनं रोहित शर्मा याला प्रपोज करत त्याला मोबाईलवरुन न्यूड फोटो पाठवले होते. सोफिा पीआर एजंन्सी संचालक नम्रता कुमारसह २०१२ च्या आयपीएलच्या हंगामादरम्यान पुण्याच्या संघातील राहुल शर्मा आणि वायने पर्नेल या खेळाडूंना रेव्ह पार्टीला घेऊन गेली होती. ज्या पार्टीमध्ये पोलिसांनी धाड टाकली असता खेळाडू उत्तेजक पदार्थांचं सेवन करताना आढळले होते.
जोहद हमीदमुळं ऑस्ट्रेलियन खेळाडू अडचणीत
२०१२ च्या आयपीएलच्या हंगामात ऑस्ट्रेलियन खेळाडू ल्यूक पॉर्म्सबॅक याला एका अमेरिकन मुलीची छेड काढणं महागात पडलं होतं. जोहद हमीद हिनं हॉटेल स्टाफला माहिती देत पोलिसांना बोलवून ल्यूकला अटकेच्या कारवाईपर्यंत पोहोचवलं होतं.