कोलकाता : आयपीएलच्या पुढच्या मोसमासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी कोलकात्यामध्ये पार पडला. या लिलावामध्ये ३३८ खेळाडूंनी सहभाग घेतला, यातल्या ६२ खेळाडूंवर बोली लागली. आयपीएलचा लिलाव झाल्यानंतर लगेचच या लिलावासाठी आलेली सुंदर मुलगी सोशल मीडियावर ट्रेन्ड होऊ लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या लिलावात हैदराबादच्या टीमकडून या मुलीने बोली लावली. खूप कमी जणांना ही मुलगी नेमकी कोण आहे, याबाबत माहिती आहे. हैदराबादकडून बोली लावणाऱ्या या मुलीचं नाव काव्या मारन आहे.


काव्या मारन ही हैदराबादच्या टीमचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. आयपीएलदरम्यान हैदराबादच्या मॅचवेळी काव्या मारन अनेकवेळा मैदानात दिसली आहे. हैदराबादने या लिलावामध्ये फार मोठी बोली लावली नाही. हैदराबादने लिलावात एकूण ७ खेळाडू खरेदी केले, यामध्ये ५ भारतीय आणि २ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.


हैदराबादने प्रियम गर्ग आणि विराट सिंग यांच्यासारखे नवोदित खेळाडू विकत घेतले. तर मिचेल मार्श, फेबियन एलन, संदीप वांका, अब्दुल समत आणि संजय यादव यांच्यावर हैदराबादने बोली लावली. 


आयपीएल लिलाव : हे खेळाडू झाले मालामाल