आयपीएल 2020 : क्वालिफायर पहिल्या सामन्यात मुंबई विरुद्ध दिल्ली सामन्यात मुंबईने विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सामन्यात जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द मॅच ठरला. त्याने 4 ओव्हरमध्ये 14 धावा देऊन 4 विकेट घेतल्या. या सामन्यात राहुल चहरचा शानदार कॅच चर्चेचा विषय ठरला. त्याच्या हातातून कॅच सूटता सूटता वाचला. त्याने आश्चर्यकारक कॅच पकडला. हे पाहून रोहित शर्माही खाली बसून हसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटची ओव्हर सुरु होती. दिल्ली कॅपिटलने जवळपास सामना गमावला होता. अक्षर पटेलने 19 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर शॉर्ट मारला.  पण बॉल राहुल चहरच्या दिशेने गेला. चहरच्या हातातून 2 वेळा बॉल सुटला होता. पण तिसऱ्यांदा त्याने तो पकडला. यानंतर कॅप्टन रोहित शर्मा देखील बसून हसायला लागला.


सामन्यात दिल्ली कॅपिटलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉकने मुंबईला चांगली सुरुवात दिली. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 15 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने रविचंद्रन अश्विनला बॉलिंग दिली. त्याने पहिल्याच बॉलवरवर रोहित शर्माला आऊट केलं. त्यानंतर सूर्यकुमार यादवने डिकॉकला साथ दिली आणि त्यांनी सामना मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेला.



मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 200 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीचा संघ आठ विकेट्सवर 143 धावा करू शकला. दिल्लीला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पैकी एक संघाशी त्यांचा सामना होईल.