मुंबई : दुबईमध्ये पार पडत असणाऱ्या आयपीएल 2020 या क्रिकेटच्या महाकुंभामध्ये नुकताच मुंबई विरुद्ध बंगळुरू या संघांतील सामना पार पडला. ज्यामधील अनेक क्षणांची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. अशा या सामन्यादरम्यान hardik pandya  हार्दिक पांड्या आणि ख्रिस मॉरिस या दोन्ही खेळाडूंना खडे बोलही सुनावे लागले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरूच्या संघातील खेळाडू ख्रिस मॉरिस आणि मुंबईच्या संघातील ऑलराऊंडर हार्दिक पांड्या यांच्यामध्ये सामन्यात खटका उडाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईच्या १९ व्या षटकादरम्यानचा हा प्रसंग. जेव्हा पांड्यानं मॉरिसन टाकलेल्या चेंडूवर षटकार लगावत त्याला अनुसरून इशारा केला. पाचव्याच चेंडूवर मॉरिसनं त्याला बाद करत पुन्हा एक इशारा केला. 


तो बाद होऊन परतत असताना मॉरिसनं काही इशारा केला, ज्यामुळं या दोन्ही खेळाडूंमध्ये ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. हा सामना मुंबईच्या संघानं जिंकला असला तरीही या दोन खेळाडूंमध्ये झालेली ही इशाराबाजी अनेकांच्याच नजरेत आली. 


 


मुख्य म्हणजे आयपीएलच्या काही महत्त्वपूर्ण नियमानुसार ही बाब लक्षात आणून दिली जाताच या दोन्ही खेळाडूंनी आपली चूक कबुल केली. मॉरिसनं IPL 2020च्या आचारसंहितेतील लेवल 1 मधील 2.5 नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप होता. तर, पांड्यावर लेवल एकमधील 2.2 नियमच्या उल्लंघनाचा आरोप होता. मुळात त्या दोघांनीही ही बाब स्वीकारल्यामुळं आता पुढील सुनावणीची आवश्यकता नसून हे प्रकरण इथंच थांबलं आहे.