अबुधाबी : आयपीएल 2020 च्या 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 57 रनने पराभव केला आहे. मुंबई इंडियन्ससाठी जसप्रीत बुमराहने 4,  ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिंसनने 2 विकेट घेतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानकडून सर्वाधिक 70 रन जोस बटलरने केले. याआधी मुंबईकडून सूर्यकुमार यादवने नाबाद 79 रन्सची खेळी केली. 


राजस्थान रॉयल्सला मुंबई संघाने 194 रन्सचं टार्गेट दिलं होतं. 18.1 ओव्हरमध्ये 136 रनच्या स्कोरवर राजस्थानची टीम ऑलआऊट झाली. मुंबईचा तब्बल 57 रनने विजय झाला. यंदाच्या सीजनमधला राजस्थान रॉयल्सचा हा सलग तिसरा पराभव आहे.