शारजाह : आयपीएल २०२० पूर्वी आरसीबी संघाचा खेळाडू देवदत्त पडिक्कल याचं नाव देखील अनेकांना माहित नव्हतं. परंतु या फलंदाजाने सध्याच्या मोसमात 3 अर्धशतके झळकावून जगासमोर आपली क्षमता दाखवली आहे. पडिक्कलची विकेट पडणे किती महत्त्वाचे आहे हे प्रत्येक विरोधी संघाला आता माहित आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पंजाब आणि बंगळुरु यांच्या सामन्यात पडीक्कलला लवकर आऊट करण्यात पंजाबला यश आहे. निकोलस पूरनच्या या उत्तम कॅचमुळे पंजाबला मोठा फायदा झाला.


महत्त्वाचे म्हणजे पडिक्कल बंगळुरूकडून सतत चांगली खेळी करत होता. हा खेळाडू आरसीबीला चांगली सुरुवात करुन देत होता. ज्यामुळे नंतर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्ससारख्या दिग्गज खेळाडूंवर कोणताही दबाव येत नव्हता. पंजाब विरुद्धच्या या सामन्यात पडिक्कलची विकेट किती मोठी आहे हे सर्वानाच कळाले.


सामन्याच्या चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर पंजाबचा गोलंदाज अर्शदीप सिंगच्या बॉलवर पडिक्कल आऊट झाला. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाण्याआधीच निकोलसने शानदार कॅच करत 12 बॉलमध्ये 18 रन करणाऱ्या पडिक्कला आऊट केले.