दुबई : केकेआरविरुद्धच्या सामन्यादरम्यान आरसीबीचा गोलंदाज मोहम्मद सिराज यांने पावरप्लेमध्ये 3 बळी घेऊन आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. 2 च्या इकॉनॉमी रेटने त्याने 4 ओव्हरमध्ये फक्त 8 धावा दिल्या. सिराजच्या या कामगिरीबद्दल त्याला 'सामनावीर सामना' म्हणून गौरविण्यात आले. आरसीबीने हा सामना 8 गडी राखून जिंकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयाचा नायक मोहम्मद सिराजने जे केले ते आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाने केले नाही. सामन्यादरम्यान आयपीएलच्या इतिहासातील तो पहिला गोलंदाज ठरला. विराट कोहलीने सिराजचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आणि त्याचा निर्णय अत्यंत यशस्वी ठरला. सिराज यानेही संधीचे सोनं केलं.



सध्याच्या आयपीएल हंगामात सिराजने 4 सामने खेळले आहेत. त्यादरम्यान त्याने 18.33 च्या सरासरीने 6 विकेट्स घेतल्या आहेत. केकेआरविरूद्ध कर्णधार विराट कोहली आणि युजवेंद्र चहल यांनीही सिराजच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.