दुबई: आयपीएलचे दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू झाले आहेत. या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सला एकामागोमाग एक धक्के मिळत आहेत. कॅप्टन कूल धोनीने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. तर मुंबई संघात दोन मोठे बदल करण्यात आले. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या हा सामना खेळणार नाहीत. तर किरोन पोलार्डला कर्णधार करण्यात आलं. पोलार्डच्या टीमने चेन्नई संघाच्या फलंदाजांना जेरीस आणलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात मोठा धक्का म्हणजे स्टार खेळाडू जखमी झाला आहे. मैदानात अंबाती रायडू बॅटिंगसाठी आल्यानंतर त्याच्य़ा हाताला बॉल लागला. दुखापत झाल्याने तो पुढे खेळू शकला नाही. अंबाती मैदानातच बसला. दुखापतीमुळे त्याला न खेळताच तंबुत परण्याची वेळ आली. 


बोल्टने फाफ ड्युप्लेसिसची विकेट काढली. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये रायडू जखमी झाला. तर रैना देखील आऊट झाला आहे. त्यामुळे सामन्याच्या सुरुवातीचे ओव्हर तर चेन्नईसाठी मोठा धक्का आहेत. मुंबईचे बॉलर्स चेन्नईच्या फलंदाजांना जेरीस आणत आहेत. 


मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), किरोन पोलार्ड (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कृणाल पांड्या, एडम मिलने, राहुल चाहर, सौरभ तिवारी, अनमोलप्रीत सिंह, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.


चेन्नई सुपरकिंग्स प्लेइंग इलेव्हन: फॉफ डुप्लेसी, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, इमरान ताहीर, जोश हेजलवूड.