मुंबई : विराट कोहली आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आरसीबीसाठी ओपनिंग करताना दिसू शकतो. हे पहिल्यांदाच होईल असं नाहीये. पण यंदाच्या सीजनमध्ये विराट ओपनिंगला येण्याची शक्यता आहे. विराट कोहलीने इंग्लंडच्या विरुद्ध टी-20 सीरीजमध्ये शेवटच्य सामन्यामध्ये असंच केलं होतं. त्याने यावेळी 52 बॉलमध्ये 80 रनची खेळी केली होती. या सामन्यानंतर तो म्हणाला की तो RCB साठी ओपनिंग करेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबीने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. विराट कोहलीने यामध्ये अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे. विराटने म्हटलं की, मागच्या वर्षी तो माईक हेसन आणि सायमन कॅटिज सोबत बोलला होता. त्याने 14 व्या सीजनमध्ये ओपनिंग करण्याची इच्छा वर्तवली होती. 


इंग्लंडच्या विरुद्ध सामन्यात केलेल्या ओपनिंगमुळे आत्मविश्वास वाढल्याचं त्याने म्हटलं आहे. तो पुऩ्हा असं करु शकतो. त्याचा हा अनुभव आयपीएलमध्ये कामात येईल असं देखील विराट कोहलीने म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विराट कोहली ओपनिंगसाठी उतरतो का हे पाहावं लागेल.


विराट कोहलीने सांगितलं की, जेव्हा त्याच्याकडून रन होत नव्हते. तेव्हा त्याने एबी डिविलियर्स सोबत ही चर्चा केली होती. मी त्याला विचारलं होतं की, जेव्हा तुला शंका असते तेव्हा तू काय करतोस? त्याने खूप सोप्या शब्दात सांगितलं की, 'मी बॉलवर लक्ष केंद्रीत करतो. लांब करिअरमध्ये फॉर्म कायम ठेवणं सोपं नसतं. फलंदाजांच्या करिअरमध्ये अशी स्थिती येत असते.'