मुंबई: पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स संघाने दणदणीत विजय मिळवला. याचं श्रेय रविंद्र जडेजा आणि गोलंदाज दीपक चाहर यांनी धुमाकूळ घातला. दीपक चहरने पहिल्या 13 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीवर रवी शास्त्री आणि कॅप्टन कूल खूप खूश आहेत. त्याची कामगिरी पाहून महेंद्र सिंह धोनीने त्याच्यावर नवीन जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईचा गोलंदाज दीपक चाहरने 13 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांचं खूप कौतुक होत आहे. त्याच्या गोलंदाजीनं पंजाब संघाला घाम तर फुटलाच शिवाय धावा काढणंही मुश्कील होऊ लागलं. चेन्नईच्या विजयात चाहरचा मोठा वाटा आहे. 



चाहरच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्याची कालच्या सामन्यातील कामगिरी पाहून धोनी त्याच्यावर नवी जबाबदारी देणार आहे. ही जबाबादारी आहे पावर प्लेची. 


 


दीपक चहरने थेड ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याऐवजी आता पावर प्लेमध्ये गोलंदाजी करावी असा धोनीचा मानस आहे. थेड ओव्हरसाठी संघात दुसरा गोलंदाज आहे. मात्र कालच्या सामन्यानंतर चाहरने पावर प्लेमध्येच गोलंदाजी करावी आणि ही जबाबादारी धोनी चाहरला देणार असल्याची माहिती मिळाली आहे.