मुंबई: चेन्नई सुपरकिंग्सने पंजाब विरुद्ध सामना खेळून त्यांचा 6 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात अनेक मजेदार गोष्टी देखील घडल्या आहेत. सुपरमॅनसारखा बॉल कॅच पकडताना रविंद्र जडेजा दिसला. इतकच नाही तर दीपक चहरच्या धमाकेदार गोलंदाजीनं पंजाबचे फलंदाज हैराण झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यादरम्यान मैदानात जल्लोष आणि आनंद साजरा केला जातो. बॉलरनं आऊट केल्याच्या आनंदात चक्क सुपरस्टार विजयच्या मास्टर गाण्यातील वाथी कमिंग गाण्यावर मैदानात डान्स केला. त्याचा डान्स पाहून अंबाती रायडूला हसू आवरेना झालं. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 





ब्रावोने 2 ओव्हरमध्ये केवळ 10 धावा देत पंजाबच्या आर अश्विनला आऊट केलं. दोन ओव्हरमध्ये त्याला केवळ एक विकेट घेण्यात यश मिळालं. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्याने हा मजेशीर डान्स केला. 



याआधी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध राजस्थान झालेल्या सामन्यात राजस्थान संघातील परागनं बिहू डान्स केला होता. विकेट घेतल्यानंतर त्याने केलेल्या बिहू डान्सची सोशल मीडियावर तुफान रंगली होती. त्यानंतर आता ब्रावोचा डान्सही खूप गाजत आहे.