मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 47 वा सामन्यात (IPL 2021 Macth 47th Result) राजस्थानने (RR) चेन्नईवर (CSK) 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह राजस्थाने प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवले आहे. या सामन्यात चेन्नईला जरी पराभव स्वीकारावा लागला. तरीही त्यांचा स्टार सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सर्व क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली.  (ipl 2021 csk opener ruturaj gaikwad likely be get wild card entry in t 20 world cup)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋतुराजने चेन्नईच्या डावातील शेवटच्या चेंडूवर सिक्स ठोकत आयपीएलमधलं पहिलंवहिलं शतक साजरं केलं. ऋतुराजने 60 चेंडूत 168.33 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 101 धावा केल्या. ऋतुराज या मोसमात सात्त्यत्याने चांगली बॅटिंग करतोय. त्यामुळे त्याला टी 20 वर्ल्ड कपसाठी (T 20 World Cup 2021) संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


टी 20 वर्ल्ड कपसाठी काही दिवसांपूर्वीच 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली. यामध्ये ईशान किशनसारख्या फलंदाजांचा समावेश आहे. मात्र ईशान आणि इतर खेळाडू हे आयपीएलमध्ये अपयशी ठरतायेत. 


तर ज्यांना वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळालं नाही, ते अफलातून खेळी करतायेत. त्यामुळे येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये बदल करण्यात येणार असल्याचं म्हंटल जात आहे. यामुळे ऋतुराजला त्याच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कपमध्ये संधी देण्यात यावी, अशी ऋतुराजच्या चाहत्यांचं म्हणंन आहे. 


ऋतुराजला संधी मिळाल्यास डच्चू कोणाला?


आता मुद्दा येतो तो म्हणजे ऋतुराजला संधी दिली तर संघातून कोणा एकाला बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. यामध्ये ईशान किशनला डच्चू मिळण्याची शक्यता अधिक आहे, कारण त्याची आयपीएलच्या 14 व्या मोसमातील कामगिरी. टी 20 वर्ल्ड कपसाठी शिखर धवनसारख्या फलंदाजाला वगळून निवड समितीने ईशानला संधी दिली. 


ईशानचा संघात राखीव सलामीवीर म्हणून समावेश करण्यात आला. मात्र ईशानला निवड समितीचा विश्वास आयपीएलमधील कामगिरीच्या माध्यामातून सार्थ ठरवता आलेला नाही. इतकंच नाही तर तो फ्लॉप ठरत असल्याने त्याला मुंबई इंडियन्सनेही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. त्यामुळे ईशानला टी 20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळू शकतो. 


ऋतुराजची आयपीएल कारकिर्द


ऋतुराजने 2020 मध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमातून चेन्नईकडून पदार्पण केलं. ऋतुराजने आतापर्यंत एकूण 18 आयपीएल सामन्यांमध्ये 50.85 च्या सरासरी आणि 134.08 स्ट्राईक रेटने 712 धावा केल्या आहेत . यामध्ये 1 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच ऋतुराजने नुकतेच श्रीलंके विरुद्ध टी 20 पदार्पण केलं होतं.