IPL 2021: आवेश खानकडून कॅप्टन कूल धोनी डक आऊट, फॅन्सकडून ट्रोल
6 वर्षांनंतर पुन्हा IPLच्या मैदानात; पहिल्याच सामन्यात माहीला मोठं अपयश
मुंबई: चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स नुकता सामना पार पडला. गुरु शिष्याच्या या लढतीत ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स संघानं मोठ्या फरकानं दणदणीत CSK संघावर विजय मिळवला. या सामन्यात पराभव झाल्यानंतर धोनीला मोठा दणका बसला आहे. दिलेल्या वेळेत ओव्हर पूर्ण न झाल्यामुळे संघाला 12 लाखांचा दंड ठोठवण्यात आला.
दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघातील गोलंदाज आवेश खाननं महेंद्र सिंह धोनीला मैदानात येताच तंबूत धाडलं आहे. महेंद्र सिंह धोनी शून्यवर आऊट झाल्यानं चाहत्यांनी आवेशलाही ट्रोल केलं आहे. तर काही जणांनी त्याचं कौतुक केलं आहे.
6 वर्षांनंतर धोनी IPL खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. सरावादरम्यान त्याचे हेलिकॉप्टर शॉट्स खूप जबरदस्त सुरू होते. त्याचे व्हिडीओ देखील समोर आले होते. मात्र सामन्या दरम्यान धोनीला शून्यवर आऊट केल्यानं क्रिकेटप्रेमी आणि CSK संघाची काहीशी निराशा झाली.