मुंबई: चेन्नई विरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता संघाने अखेरपर्यंत जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, पॅट कॉमिन्सन या तिघांनी आपल्या उत्तम कागिरीनं संघाला विजयाच्या जवळ नेलं. मात्र आंद्र रसेल आऊट झाल्यानंतर मोठी निराशा झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंद्रे रसेलनं आपल्या तुफान बॅटिंगनं मैदानात धुरळा उडवला. एक क्षण वाटलं की संपूर्ण बाजी फिरेल की काय? त्याने 22 बॉलमध्ये 54 धावांची दमदार खेळी केली. कोलकाताच्या 12 व्या ओव्हरमध्ये सॅम करननं रसेलला क्लिन बोल्ड केलं. आऊट झाल्यानंतर रसेलची खूप मोठी निराशा झाली. तो हताशपणे ड्रेसिंग रुमच्या पायऱ्यांवर बसून राहिला. आपण आऊट झाल्याचं दु:ख आणि संघाला जिंकवून देऊ शकलो नाही याची उणीव असे मनात विचार असताना तो भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. 




रसेलने 54 धावांमध्ये 6 षटकार आणि 3 चौकार ठोकले होते. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 245.45 इतका होता. त्याने 21 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केलं त्याचं संघातही खूप कौतुक झालं. 


आंद्रे रसेलचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. तर अभिनेता शाहरूख खाननं पॅट आणि रसेलचं कौतुक केलं आहे. त्या दोघांनी उत्तम कामगिरी केली. दिनेश, पॅट आणि रसेल या तिघांनी मिळून संघाला 202 धावांपर्यंत नेलं मात्र 18 धावा कमी पडल्यानं अखेर कोलकाता संघाला पराभव स्वीकारावा लागला.