मुंबई: वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. या सामन्याआधी महेंद्र सिंह धोनीला मोठा धक्का देणारी बातमी येत आहे. क्रिकेट विश्वावर कोरोनाचं महासंकट तर आहेच. अशा परिस्थितीही सर्व खेळाडू काळजी घेत आहेत. धोनीच्या आयुष्यातील सर्वात खास असलेल्या दोन व्यक्ती कोरोनाच्या विळख्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर आज सामना आहे. चेन्नईचं नेतृत्व करणाऱ्या धोनीच्या आई-वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. 


NBTने दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी महेंद्रसिंह धोनीचे वडील पान सिंह आणि त्याची आई देविका देवी यांना रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार धोनीच्या आई-वडिलांची स्थिती सध्या स्थिर आहे. ऑक्सिजनची पातळीही ठिक आहे. 


कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसांपर्यंत अजून मोठ्या प्रमाणात पोहोचला नाही. त्यामुळे त्याचे आई-वडील नक्की या संकटातून बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. 


महाराष्ट्रासह देशात झपाट्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचं नवीन म्युटेशन अधिक धोकादायक असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. झारखंड इथे मंगळवारी 4969 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत.