दुबई: कॅप्टन कूल धोनीचा चेन्नई विरुद्ध कोहलीची टीम बंगळुरूचा आज सामना होणार आहे. या सामन्याची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. दोन तगड्या टीम मैदानात धुरळा  उडवणार आहेत. यंदाच्या हंगामात चेन्नई आणि बंगळुरू दोन्ही संघ कडवी टक्कर देताना दिसले. त्यामुळे या दोन्ही टीम आमने-सामने आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता तर अजून शिगेला पोहोचते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या दोन मोठी नावं एकमेकांविरुद्ध मैदानात खेळताना दिसणार आहेत. या हंगामात कोहली शेवटचं कर्णधार म्हणून खेळणार असल्याची चर्चा आहे. मुंबई संघाविरुद्ध कमी धावा करून देखील चेन्नईनं चांगला विजय मिळवला होता. आता चेन्नईचे शिलेदार बंगळुरूवर कसा विजय मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर विराट आपल्या टीममध्ये काही बदल करणार का? हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


काय सांगतायत हेड टू हेड सामने


आतापर्यंत चेन्नई विरुद्ध बंगळुरू संघ आयपीएलमध्ये 27 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. त्यापैकी चेन्नई संघ 17 सामने जिंकला आहे. तर 9 सामने गमवले आहेत. बंगळुरू संघाने 9 सामने जिंकले असून 17 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. एक सामना ड्रॉ झाला आहे. या हंगामात आता कोण कोणावर भारी पडणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेड टू हेडच्या आकडेवारीनुसार चेन्नई संघाने सर्वाधिक वेळा बंगळुरूवर विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यातही चेन्नईच जिंकणार असा क्रिकेटप्रेमींचा दावा आहे. कोरोनामुळे आयपीएलचे दुसऱ्या टप्प्यातील सामने UAE इथे सुरू आहेत. तर हे सामने पाहण्यासाठी काही प्रेक्षकांना कोरोनाचे नियम पाळून परवानगी देण्यात आली आहे. आजच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे.