मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज चेन्नई सुपर विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. राजस्थान संघाचा युवा कॅप्टन संजू सॅमसनवर आज थोडा दबावही असणार आहे. कॅप्टन कूल धोनी आणि राजस्थान रॉयल्स दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असणार आहे. या सामन्यात चेन्नई दरवर्षीप्रमाणे यंदाही वरचढ ठरणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. चेन्नईने पंजाब संघावर 6 विकेट्सनं विजय मिळवला होता. तर राजस्थान संघाने दिल्ली कॅपिटल्सवर 3 विकेट्सने विजय मिळवला होता. 


राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स 2008-2021 या कालावधीत झालेल्या सामन्यांमध्ये 23 सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. त्यापैकी 14 सामने चेन्नई सुपरकिंग्स संघ जिंकला आहे. तर केवळ 9 सामने आपल्या नावावर करून घेण्यात राजस्थानला यश मिळालं. युवा नेतृत्व असलेला संजू सॅमसन आज चेन्नईला टफ फाईट देणार का? हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 



चेन्नई सुपरकिंग्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन


ऋतुराज गायकवाड/रॉबिन उथप्पा, फाफ डुप्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, सॅम करन, महेंद्र सिंह धोनी, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर


राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन


 मनन वोहरा/यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन साकरिया, मुस्तफिजुर रहमान