चेन्नई : आयपीएल 2021 च्या (IPL 2021)  सहाव्या मॅचमध्ये आरसीबी (RCB) ने सनरायजर्स हैदराबादला (SRH)  6 धावांनी हरवले आहे. मात्र ही मॅच हैदराबादचा कॅप्टन डेविड वॉर्नर (David Warner) ला फायदेशीर ठरली.  डेविड वॉर्नरने 37 बॅालमध्ये 54 धावांची तुफान खेळी खेळली, तरीही त्याला आपल्या टीमला जिंकवता आले नाही. परंतु डेविड वॉर्नरने सीएसकेचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) चा रेकॉर्ड तोडला.


धोनीपेक्षा वरचढ वॉर्नर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबीच्या (RCB) विरोधात आयपीएल करियरचा 49 वा अर्ध शतक मारुन डेविड वॉर्नरने (David Warner) एमएस धोनीला (MS Dhoni) आरसीबीच्या विरोधात सर्वात जास्त धाव करण्यामध्ये मागे टाकले आहेत.


वॉर्नरचे आता आरसीबी विरोधात 877 धावा झाल्या आहेत. तर धोनीने विराट कोहली च्या संघा विरोधात 854 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर धोनीच्याच संघातील खेळाडू सुरेश रॅना आहेत, ज्याने 755 धाव केल्या आहेत. त्यानंतर रोहित शर्माही या रांगोत आहे. त्याने आरसीबी विरोधात 716 धावा केल्या आहेत.


वॉर्नरच्या नावे सर्वात जास्त 50


या रेकॉर्डशिवाय डेविड वॉर्नरच्या नावे (David Warner) आयपीएलमध्ये सर्वात जास्त अर्ध शतक केल्याची नोंद आहे. वॉर्नरच्या नावावर आयपीएलमध्ये एकूण 49 आर्ध शतकं आहेत. दुसर्‍या नंबरवर दिल्ली कॅप्टल्सचा शिखर धवन आहे, त्याच्या नावावर 42 आर्ध शतकं आहेत.  तर तिसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा कॅप्टन कोहलीचे नाव आहे, त्याने 39 आर्ध शतकं मारी आहेत.


14 एप्रिलला झालेल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्सची टीमने बॅटिंग केली आणि सनरायझर्स हैदराबादसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर हैदराबादच्या टीमने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 143 धावा केल्या आणि कोहलीच्या संघाने 6 धावांनी सामना जिंकला.