मुंबई: हैदराबाद संघाने पंजाब विरुद्ध आपला विजय मिळवला आहे. आता दुसरा विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. तर चेपॉक स्टेडियमवर आपला दुसरा विजय मिळवण्यासाठी दिल्ली संघही सज्ज झाला आहे. दिल्ली संघाला हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनावर यशस्वीपणे मात करून आलेला अक्षर पटेल आजच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. तो हा सामना खेळण्याची शक्यता कमी असल्याचाही काहींचा कयास आहे. मात्र ऋषभ पंत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


सलग तीन पराभवाचे धक्के स्वीकारल्यानंतर हैदराबाद संघाने पहिल्यांदा पंजाब विरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला आहे. डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअर स्टो आणि केन विलियमसनच्या तुफान फलंदाजीमुळे हैदराबदला विजय मिळाला. 


IPL 2021: राजस्थानचा जादूगर! डेव्हिडचा डगआऊटमध्ये अतरंगी खेळ



दिल्ली संघात शिखर धवन, स्टीव स्मिथ, शिमरोन आणि ऋषभ पंत अशी तगडी फलंदाजांची फळी आहे. गेल्या काही सामन्यात शिखर धवन खूप चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसला. तर सध्या धवनकडे ऑरेंज कॅपही आहे. गोलंदाज अश्विन आणि अमित मिश्रा हैदराबादच्या फलंदाजांना कसं रोखणार हे पाहाणं महत्त्वाचं आहे. 


सचिनकडून शार्दुला कानमंत्र - सचिननं असं काय सांगितलं ज्यामुळे शार्दुलचं आयुष्य बदललं


दिल्ली संघाचे गोलंदाज हैदराबादच्या फलंदाजांना कसं रोखणार? दिल्ली संघाचं तगडं आव्हान वॉर्नर कसं पेलणार हे आज संध्याकाळी चेपॉक स्टेडियमवर पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


दिल्ली संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन


पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, शिमरोन हेटमायर, ललित यादव, आर अश्विन, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, आवेश खान