सचिनकडून शार्दुला कानमंत्र - सचिननं असं काय सांगितलं ज्यामुळे शार्दुलचं आयुष्य बदललं

भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरने 24 एप्रिलला त्याचा 48 वा वाढदिवस साजरा केला.

Updated: Apr 25, 2021, 02:42 PM IST
सचिनकडून शार्दुला कानमंत्र - सचिननं असं काय सांगितलं ज्यामुळे शार्दुलचं आयुष्य बदललं title=

मुंबई : भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरने 24 एप्रिलला त्याचा 48 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने सचिनला जगातील कानाकोपऱ्यातून शुभेच्छा मिळाल्या. आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जने देखील मास्टर ब्लास्टरचे अभिनंदन केले आहे.

त्यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने मुंबईतील ड्रेसिंग रूमधील एक किस्सा शेअर केला, यामध्ये जेव्हा सचिन तेंडुलकरने त्याला सल्ला दिला त्याबद्दल त्याने सांगितले .

मास्टर ब्लास्टने त्याला सराव करत रहाण्यास सांगितले असे शार्दुलने उघड केले. शार्दुल म्हणाला की, सचिनने सल्ला दिला होता की, "जरी तू सामना खेळला नाहीस तरी सराव कर त्यामुळे लेंथ आणि वेग यावर तुला मदत मिळेल."

शार्दुल ठाकूर म्हणाला की, हे कदाचित माझ्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी किंवा रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर ची गोष्ट आहे. मी सचिन पाजींशी काहीतरी चर्चा करत होतो. तेव्हा ते लाइन बद्दल मला समजावत होते. तेव्हा सचिनने मला आठवण करुन दिले की, तुला लक्षात आहे? मी या आधी तुला लेंथ आणि वेग याबद्दल सांगितले होते. ते तु करत रहा.

ठाकूर म्हणाले की, तेव्हा त्याला सचिनने सांगितले की, तु सामन्यांचा सराव तर करचं परंतु त्यानंतरही वेळ काढ आणि  सराव करत रहा. मला असे वाटते की, यामुळे खूप फायदा झाला आहे.

आयपीएलच्या या सीझनमध्ये ठाकूर चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. आणि त्यांनी 11.27 च्या इकोनॅामीवर चार सामन्यांत फक्त 3 विकेट घेवू शकला आहे.