मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2021मध्ये हैदराबाद संघाने आता कुठे पहिला विजय मिळवला असतानाच एक दु:ख बातमी समोर येत आहे. हैदराबाद संघातील स्टार खेळाडू टी नटराजन IPLमधून बाहेर गेला आहे. आतापर्यंत त्याने दोन सामने खेळले आहेत. यापुढचे सामने तो खेळू शकणार नाही ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार टी नटराजनच्या गुडघ्यामध्ये दुखापत झाल्यामुळे तो यापुढचे सामने खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. हीच दुखापत पुन्हा एकदा डोक वर काढत असल्यानं त्याला पुढील सामने खेळता येणार नाही. तर टी नटराजन ऐवजी संघात कोणाला रिप्लेस करणार याबाबत अद्याप फ्रेंचायझीकडून निर्णय आलेला नाही.



आतापर्यंत टी नटराजनने या हंगामातील फक्त दोन सामने खेळले आहेत. त्यानंतर टी नटराजनच्या गुडघ्यात त्रास होऊ लागल्यानं त्याच्याऐवजी संघात प्लेइंग इलेवनसाठी खलील अहमदला संधी देण्यात आली होती. गुरुवारी पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पहिला सामना जिंकला आहे. सलग तीन सामने पराभव स्वीकारल्यानंतर पंजाब विरुद्धचा चौथा सामना जिंकण्यात यश मिळालं आहे. 


डेव्हिड वॉर्नरने  टी नटराजनच्या गुडघ्याला दुखापत होत असल्याची माहिती दिली होती. त्याच्या गुडघ्याचा एक्स रे काढण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिन्ही फॉरमॅटमध्ये म्हणजेच कसोटी, वन डे आणि टी 20 या तिन्हीमध्ये डेब्यू करणारा टी नटराजन हा पहिला भारतीय खेळाडू आहे. 


भुवनेश्वर कुमारला देखील दुखापत झाल्यामुळे तो खेळत नाही. तर दुसरीकडे टी नटराजन देखील संपूर्ण IPL बाहेर गेल्यानं आता हैदराबाद संघाचं टेन्शन वाढलं आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा पुढचा सामना 25 एप्रिलला होणार आहे. दिल्ली विरुद्ध हैरदाराब सामना चेपॉक स्टेडियमवर होणार आहे.