मुंबई: हिटमॅनची टीम मुंबई इंडियन्सला दिल्ली संघाने दणका दिला आहे. आज झालेल्या मुंबई विरुद्ध सामन्यात दिल्ली संघाने 4 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. IPL 2021 च्या 14 व्या हंगामातील दुसऱ्या सत्रात दिल्ली संघाने मुंबईला विजयापासून रोखलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शारजाह इथे झालेल्या दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यात रोहित शर्माच्या टीमचा पराभव झाला आहे. दिल्ली टीमने प्ले ऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. मुंबई संघासमोर आता प्ले ऑफसाठीच्या अडचणी वाढल्या आहेत. प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या स्वप्नाला धक्का पोहोचला आहे. मुंबई संघ अजूनही 16 अंकांपर्यंत पोहोचू शकला नाही. चेन्नईनंतर दिल्ली प्ले ऑफमध्ये जाणारा दुसरा संघ ठरला आहे. 


मुंबई संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 ओवरमध्ये 8 विकेट्स गमावून दिल्ली संघाला 129 धावांचं लक्ष्य दिलं. दिल्ली संघाने 130 धावा करून 4 विकेट्सनं मुंबईवर विजय मिळवला आहे. दिल्ली संघाकडून आवेश खान आणि अक्षर पटेलनं तीन विकेट्स घेतल्या. श्रेयस अय्यरने 33 बॉलमध्ये 33 धावा केल्या आहेत. 


ऋषभ पंतने 22 बॉलमध्ये 26 धावा केल्या तर रविचंद्र अश्विननं 21 बॉलमध्ये 20 धावा केल्या. मुंबई संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वात जास्त धावा केल्या आहेत. त्याने 26 बॉलमध्ये 33 धावा केल्या. या सामन्यात रोहित शर्माला विशेष कामगिरी करण्यात यश आलं नाही.