नवी दिल्ली: आयरपीएलचं पहिलं सत्र कोरोनामुळे स्थगित झालं. आता IPL 2 पुन्हा सुरू होणार आहे. UAE मध्ये उर्वरित 31 सामने खेळवण्यात येणार आहेत. आयपीएल सुरू होण्यापूर्वी महत्त्वाची बातमी येत आहे. चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. स्टार प्लेअर्सनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे दोन मोठ्या संघांना मोठा धक्का असल्याचं समजलं जात आहे. या प्लेअर्स ऐवजी आता कुणाला संधी देणार याकडेही लक्ष आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टो आणि पंजाब किंग्स संघाचा फलंदाज डेविड मलान यांनी काही कारणामुळे IPL मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. PBKSने आपल्या ट्वीटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे चाहतेही नाराज झाले आहेत. आता या दोघांऐवजी संघात कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष आहे. 


इंग्लंड आणि भारतातील खेळाडूंना त्यांच्या IPL  संघांमध्ये सामील होण्यासाठी चार्टर प्लेनमधून 'बबल टू बबल ट्रान्सफर' व्हावे लागणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड 5 वा कसोटी सामना तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. याचं कारणही कोरोना आहे. सपोर्ट स्टाफ मेंबरला कोरोना झाल्यानं हा कसोटी सामना स्थगित करण्यात आला. हा सामना होईल मात्र केव्हा याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. 



IPLमध्ये 4 मे रोजी खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे सामने स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा IPL सामने UAEमध्ये होणार आहेत. तर टी 20 सामने देखील UAEमध्ये खेळवले जाणार आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जे खेळाडू बाहेरून येणार आहेत त्यांना दुबईमध्ये 6 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. कदाचित याच कारणामुळे दोन खेळाडूंनी माघार घेतली असावी अशीही चर्चा आहे. 


बेअरस्टोने या आयपीएल 2021 च्या सात सामन्यांमध्ये 141 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 248 धावा केल्या. बेअरस्टो आणि मालन हे दोघेही मँचेस्टरमधील इंग्लंड कसोटी संघाचा भाग होते. आयपीएलमध्ये इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्सच्या उपस्थितीवरही सस्पेन्स कायम आहे. तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो.