Gautam Gambhir | कॅप्टन्सी सोडण्याच्या निर्णयावरुन गंभीरचा विराटवर निशाणा, म्हणाला....
विराट कोहली (Virat Kohli) याच्या या निर्णयावरुन कोलकाताचा माजी कर्णधार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) विराटवर तोफ डागली आहे.
मुंबई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील दुसऱ्या टप्प्याला 19 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात (CSK) चेन्नईने मुंबईचा (MI) पराभव केला. या दरम्यान विराट कोहलीने (Virat Kohli) मोठी निर्णय घेतला. विराट कोहली टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कपनंतर (T2O World Cup) कर्णधारपद (Captaincy) सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यात आता विराटने आयपीएलच्या 14 व्या मोसमानंतर आरसीबीची कॅप्टन्शीप (RCB Captaincy) सोडणार असल्याचं जाहीर केलं.
विराटच्या या निर्णयावरुन टीम इंडियाचा आणि कोलकाताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) विराटवर तोफ डागली आहे. (ipl 2021 gautam gambhir critisized virat kohli over step down captaincy after 14 season)
गंभीर काय म्हणाला?
"आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याच्या आधी या निर्णयामुळे मला आश्चर्य वाटलं. विराटला स्पर्धा संपल्यानंतरही हा निर्णय घेता आला असता. विराटच्या या निर्णयामुळे संघ अस्थिर होऊ शकतो. तसेच काही प्रमाणात संघ भावनिक होऊ शकतो", असं गंभीर म्हणाला. गंभीर विशेष कार्यक्रमात सामील झाला होता. यावेळेस त्याने ही प्रतिक्रिया दिली.
'कोहलीने संघावर दबाव आणला'
गंभीरनुसार, विराटच्या या निर्णयाचा परिणाम सांघिक कामगिरीवर होईल. "बंगळुरु या मोसमात दमदार कामगिरी करतेय. असं असताना तुम्ही टीमवर कशासाठी दडपण आणू इच्छिता. विराटवर संघाला आयपीएलंच विजेतपद जिंकून देण्याचा अतिरिक्त दबाव आहे. तुम्हाला एका व्यक्तीसाठी विजेतेपद जिंकायचं नाहीये, तुम्हाला ते टीमसाठी करायचं आहे", असं गंभीरने स्पष्ट केलं.
विराटचा आठवड्यात दुसरा मोठा निर्णय
दरम्यान विराटने आठवड्याभरात दुसरा मोठा निर्णय घेतला. विराटने आधी टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधारपदावरुन पायऊतार होणार असल्याचं स्पष्ट केलं. तर यानंतर बंगळुरुचंही कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं. बॅटिंगवर अधिक लक्ष देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं विराटने स्पष्ट केलं.
बंगळुरुने आयपीएलच्या 14 व्या मोसमात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. बंगळुरुने यापैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे तर 2 सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. बंगळुरु पॉइंट्सटेबसमध्ये 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान बंगळुरु आज कोलकाता विरुद्ध भिडणार आहे. बंगळुरुला प्लेऑफमध्ये धडक देण्यासाठी आणखी 3 सामने जिंकावे लागणार आहेत.